भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस) -
एमएएसडी, माही या टोपणनावाने तो ओळखला जातो. त्याची खासियत आहे त्याचा हेलिकॉप्टर शॉट.. हा पाहण्यासाठी क्रिकेट रसिक डोळ्यात प्राण आणून वाट पाहात
-
भारतीय क्रिकेट विश्वातला एक यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख आहे. २००७ आयसीसी विश्वचषक टी २०, २०१० आणि २०१६ आशिया कप, २०११ विश्वचषक, २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हे पुरस्कार टीम इंडियाने धोनी कॅप्टन असताना मिळवले.
-
एक चांगला मॅच फिनिशर अशीही त्याची ओळख होती. अनेकदा हातातून गेलेली मॅचही त्याने आपल्या खास खेळीने जिंकत विजयश्री खेचून आणली
-
महेंद्रसिंह धोनीचा लौकिक हा जगभरात पोहचला तो क्रिकेटविश्वात त्याने केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळेच
-
आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने, कसोटी सामने आणि आयपीएल मध्ये उत्तम कामगिरी केली आहे.
-
२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीची प्रसन्न मुद्रा
-
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धोनीला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही देण्यात आला होता. ७९ चेंडूत धोनीने ८ चौकार आणि २ षटकारांची बरसात करत ९१ धावा केल्या होत्या.
-
धोनी टीम इंडियाचा कॅप्टन असताना डिसेंबर २००९ मध्ये कसोटी क्रमवारीत भारत क्रमांक १ वर पोहचला.
-
तुझ्यासोबत २०११ चा विश्वचषक जिंकणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात संस्मरणीय क्षण होता. तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी तुला शुभेच्छा असं म्हणत सचिनने धोनीचं अभिनंदन केलं आहे.
-
धोनीची स्ट्रॅटेजी हे त्याचं वैशिष्ट्य होतं. कुणाला कुठे फिल्डिंगला ठेवायचं.. कोणत्या क्षणी काय करायचं याचं अचूक टायमिंग त्याच्याकडे होतं
-
सुरुवातीच्या काळात धोनी त्याच्या लांबसडक केसांसाठीही प्रसिद्ध होता. मात्र २०११ चा विश्वचषक जिंकल्यावर त्याने त्याची हेअर स्टाइल बदलली
-
एक उत्तम विकेटकिपर ही देखील माहीची ओळख होती.. त्याने घेतलेल्या विकेटबाबत कायम चर्चा होत असे..
-
क्रिकेटच्या आधी धोनीला फुटबॉलमध्ये रस होता.. शाळेच्या संघात तो उत्तम गोलकिपर होता. त्याप्रेमापोटीच त्याने इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नई एफसी हा संघही खरेदी केला होता
-
धोनीच्या आयुष्यावर सिनेमाही आला होता. एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी. या सिनेमात सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारली
-
क्रिकेटमध्ये यशाची शिखरं गाठणाऱ्या एम एस धोनीने साक्षी रावत सोबत विवाह केला आहे. या दोघांना झिवा नावाची मुलगी आहे. झिवा आणि धोनीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली