-
१५ ऑगस्ट २०२० हा दिवस कोट्यवधी भारतीय क्रिकेट प्रेमींच्या कायम स्मरणात राहणार आहे. महेंद्रसिंह धोनीने याच दिवशी संध्याकाळी निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीची बातमी येते न येते तोच त्याचा संघातला सहकारी व जवळचा मित्र सुरेश रैनानेही निवृत्ती जाहीर केली.
-
निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर साहजिकच प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर धोनीचीच चर्चा सुरु होती. परंतू या निमीत्ताने भारतीय संघासाठी सुरेश रैनाने दिलेलं योगदानही विसरता येणार नाही.
-
मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज, कामचलाऊ फिरकीपटू आणि उत्तम क्षेत्ररक्षक अशा तिहेरी भूमिका रैनाने भारतीय संघात निभावल्या. आज आपण त्याच्या नावावर असलेल्या ५ अनोख्या विक्रमांविषयी जाणून घेणार आहोत.
-
१) कसोटी, वन-डे आणि टी-२० शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज
-
२) सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारा खेळाडू, आतापर्यंत रैनाने आयपीएलमध्ये १९२ सामने खेळले आहेत. येत्या हंगामात तो २०० सामन्यांचा आकडा पार करेल.
-
३) सलग आयपीएल सामने खेळण्याचा विक्रम – २००८ ते २०१६ मध्यापर्यंत सुरेश रैनाने एकही आयपीएलचा सामना सोडला नाही. ९ व्या हंगामात गुजरातकडून खेळत असताना आपल्या मुलीच्या जन्मावेळी रैना पहिल्यांदा आयपीएल सामन्याला मुकला. यानंतर २०१८ साली चेन्नईकडून खेळत असताना तो एका सामन्याला मुकला होता.
-
४) आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज – २०१९ च्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये रैनाने हा अनेखा विक्रम आपल्या नावे केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. यानंतर विराट कोहलीनेही ही किमया करुन दाखवली.
-
५) कसोटी पदार्पणात शतक – २०१० साली रैनाने श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं. याच सामन्यात रैनाने शतकही झळकावलं. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा रैना भारताचा १२ वा फलंदाज होता.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली