-
भारतीय संघाचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाचे २४ वर्ष प्रतिनिधित्व केले. धावांचा डोंगर उभा करणाऱ्या सचिनने धडाकेबाज कारकिर्द घडवून निवृत्ती स्वीकारली.
-
मुंबईच्या वानखेडे मैदानावर घरच्या मंडळींसमोर आणि चाहत्यांसमोर त्याने साश्रू नयनांनी पण अभिमानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.
-
सचिनला निरोपाचा जंगी सामना खेळायला मिळाला; पण महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना यांसारख्या काही दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंवर मात्र निरोपाच्या सामन्याविनाच क्रिकेटला अलविदा म्हणण्याची वेळ आली. पाहूया ते दु्र्दैवी क्रिकेटपटू-
-
गौतम गंभीर- गंभीरने नोव्हेंबर २०१६ला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर जवळपास २ वर्षे पुनरागमनाची वाट पाहिली. पण अखेर पुनरागमनाची संधी न मिळाल्यामुळे ३ डिसेंबर २०१८ला गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
-
युवराज सिंग- 'सिक्सर किंग' युवराजने जून २०१७मध्ये शेवटचा वन डे सामना खेळल्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही. २०१९च्या विश्वचषकात आपल्याला पुनरागमनाची संधी मिळेल, असे युवराजला वाटत होते. पण तसे न झाल्याने युवराजने १० जून २०१९ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
-
विरेंद्र सेहवाग- सेहवागने मार्च २०१३ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर सेहवागने तब्बल २ वर्षे पुनरागमनाची वाट पाहिली. पण, दुर्दैवाने त्याला २० ऑक्टोबर २०१५ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करावी लागली.
-
झहीर खान- झहीर खानने फेब्रुवारी २०१४ला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर संघात स्थान न मिळाल्याने १५ ऑक्टोबर २०१५ला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
-
व्हीव्हीएस लक्ष्मण- प्रसिद्ध कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने २०१२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने जवळपास ६ महिने वाट पाहिली आणि अखेर १८ ऑगस्ट २०१२ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
-
महेंद्रसिंग धोनी- धोनीने २०१९च्या विश्वचषकात जुलै महिन्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर त्याने दोन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही त्याला संघात स्थान न मिळाल्याने अखेर १५ ऑगस्ट २०२०ला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.
-
सुरेश रैना- सुरेश रैनाने १७ जुलै २०१८ मध्ये शेवटचा वन डे सामना खेळला. त्यानंतर त्याला टी-२० संघात स्थान मिळेल अशी आशा होती, पण तसं न घडल्याने त्यानेदेखील धोनीबरोबरच १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली.

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ