-
बहुप्रतिक्षित IPL 2020साठी २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सर्व संघ आणि खेळाडू हळूहळू IPLसाठी बॅग्ज पॅक करून तयार आहेत.
-
अभिनेत्री प्रिती झिंटाचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ रवाना होतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. पंजाब संघाच्या फोटोत अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी, संघाचे प्रशिक्षक आणि 'रणजी' किंग वासिम जाफर, मनदीप सिंग हे खेळाडू दिसत आहेत.
-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा राजस्थान रॉयल्स संघदेखील युएईसाठी सज्ज आहे. राजस्थान रॉयल्स संघाने 'युएई रेडी' असे फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोंमध्ये यशस्वी जैस्वालसारखे काही नवोदित खेळाडू युएईसाठी रवाना होताना दिसत आहेत.
-
RCBच्या संघानेदेखील आपल्या खेळाडूंची विशेष अशी काळजी घेतली आहे. आपल्या खेळाडूंना मुंबई ते युएई प्रवासात कोणतीही समस्या उद्धवू नये यासाठी प्रत्येक खेळाडूचे नाव असलेली किट बॅग तयार करण्यात आली आहे.
-
उमेश यादव, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी या RCBच्या गोलंदाजांच्या बॅग्ज पॅकसुद्धा झाल्या असून ते उड्डाणासाठी तयार आहेत.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझर अशा सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींनी युक्त अशा या किट बॅग्ज आहेत.
-
टीम इंडियासाठी खेळणाऱ्या बहुतांश खेळाडूंच्या बॅग्जचे फोटो RCBकडून ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहेत. अगदी भारताचा नवखा खेळाडू शिवम दुबेच्या बॅगचाही फोटो यात आहे.
-
असे असताना भारताचा आणि RCBचा कर्णधार विराट कोहली याची बॅग मात्र कुठेच दिसत नसल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत.
-
सोशल मीडियावर RCBच्या पोस्टखाली विराट कुठे आहे? किंग कोहली काय करतोय? अशा प्रश्नांचा वर्षाव होताना दिसत आहे.
-
-
-
-
-
-

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा