-
२०१९च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. पण पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने धूळ चारली.
-
भारतीय संघात त्यावेळी आपला वर्ल्ड कपमधील पदार्पणाचा सामना खेळणारा एक खेळाडू होता. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीराला माघारी धाडलं होतं.
-
दमदार कामगिरी करणारा टीम इंडियाचा हा अष्टपैलू खेळाडू प्रेमाच्या पिचवर मात्र 'क्लीन बोल्ड' झाला. हा खेळाडू म्हणजे विजय शंकर…
-
करोनाकाळात फिरकीपटू युजवेंद्र चहलपाठोपाठ विजय शंकरनेदेखील साखरपुडा केला. त्यानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली.
-
विजय शंकर याने वैशाली विश्वेवरन हिच्यासोबत साखरपुडा केल्याची घोषणा आपल्या इन्स्टाग्रामवरून केली.
-
विजयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंगठीचा इमोजी पोस्ट करत वैशालीसोबत जीवनाची सुरूवात करण्याबाबतची घोषणा केली.
-
आपल्या साखरपुडा सोहळ्यातील काही क्षणचित्रे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली, तर काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही पोस्ट केलेली दिसले.
-
त्याला मिळालेल्या शुभेच्छांपैकी काही शुभेच्छांचे स्क्रीनशॉट त्याने आपल्या इन्स्टास्टोरीवर पोस्ट केले.
-
टीम इंडियातील आणि IPL मधील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
-
IPLमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून विजय खेळणार आहे.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक