-
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा १५ ऑगस्टला निवृत्त झाला. स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी त्याने निवृत्ती जाहीर केली.
-
२०१९च्या वन डे विश्वचषकात तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर मात्र त्याला टीम इंडियात पुनरागमन करता आले नाही.
-
धोनीच्या निवृत्तीनंतर सर्व स्तरातून त्याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्याला सलाम करण्यात आला. टेनिसस्टार सानिया मिर्झा हिनेदेखील धोनीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
सानिया मिर्झाने नुकताच स्पोर्ट्सकीडा वेबसाईटशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपर्क साधला.
-
संवादादरम्यान ती म्हणाली,"जर धोनीला निवृत्तीच्या घोषणेचा सोहळा करायचा असता, तर त्याने तो नक्कीच केला असता. त्याने तसं केलं नाही, पण आपण त्याला जंगी निरोप द्यायला हवा"
-
"धोनीने आपल्या कारकिर्दीत खूप काही मिळवलं आहे. त्यामुळे सन्मानाने निवृत्त होण्याचा त्याला अधिकार आहे", असेही सानिया म्हणाली.
-
"धोनीने शांतपणे निवृत्तीचा निर्णय घेतला. त्याचा हाच स्वभाव त्याला 'कॅप्टन कूल' ठरवतो. धोनीने केवळ स्वत:साठीच नव्हे, तर देशासाठीही अनेक विक्रम केले आहेत", याकडे सानियाने लक्ष वेधले.
-
महेंद्रसिंग धोनी आणि सानियाचा पती शोएब मलिक यांच्यामध्ये काही बाबतीत साम्य असल्याचे यावेळी सानियाने स्पष्ट केले.
-
"एमएस धोनीला पाहून मला माझ्या पतीची आठवण येते. कारण ते दोघेही शांत स्वभावाचे आहेत. त्या दोघांमधील साम्य हे विलक्षण आहे". असं सानिया म्हणाली.
-
"दोघेही शांत आहेत, पण विनोदी स्वभावाचेही आहेत. मैदानावर ते दोघेही खूप शांत आणि 'कूल' असतात. खूप गोष्टींमध्ये धोनी हा शोएबसारखाच आहे", असेही सानियाने नमूद केले.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला