-
मुंबई इंडियन्स संघ हा IPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
-
मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
-
मुंबईच्या संघात अनेक धडाकेबाज फलंदाजांचा भरणा आहे.
-
या फलंदाजांच्या बळावरच मुंबई इंडियन्स संघाने धडाकेबाज अशा धावसंख्या उभारल्या.
-
पाहूया मुंबई इंडियन्सच्या TOP 5 सर्वाधिक धावसंख्या-
-
५. २१२/६ (IPL 2010) – राजस्थान संघाविरूद्ध मुंबईने हा पराक्रम केला होता. अंबाती रायुडू (५५) आणि सौरभ तिवारी (५३) दोघांनी अर्धशतकी खेळी केली होती.
-
४. २१२/३ (IPL 2017) – दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरूद्ध मुंबईने जोरदार कामगिरी केली होती. लेंडल सिमन्स (६६) आणि कायरन पोलार्ड (६३) दोघांनी अर्धशतके लगावली होती.
-
३. २१३/६ (IPL 2018) – बंगळुरू संघाविरूद्ध मुंबईने ही धावसंख्या उभारली होती. या सामन्यात रोहित शर्माने ९४ धावांची दमदार खेळी केली होती.
-
२. २१८/७ (IPL 2010) – दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरुद्ध मुंबईने दमदार कामगिरी केली होती. या सामन्यात सचिन तेंडुलकर (६३) आणि सौरभ तिवारी (६१) या दोघांनी अर्धशतके झळकावली होती.
-
१. २२३/६ (IPL 2017) – पंजाबविरूद्ध मुंबईने सर्वाधिक धावसंख्या उभारली होती. सलामीवीर लेंडल सिमन्स (५९) आणि अष्टपैलू कायरन पोलार्ड (५०) यांनी अर्धशतके ठोकली होती.

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”