-
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात होते आहे.
-
आतापर्यंत सर्व संघ युएईत दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे.
-
आयपीएल म्हटलं की डोळ्यासमोर येते ती फलंदाजांनी चौकार-षटकारांची केलेली आतिषबाजी…
-
ख्रिस गेल, एबी डिव्हीलियर्स, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यासारखे अनेक फलंदाज आयपीएलमध्ये फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
-
आज आपण आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या ५ फलंदाजांची यादी पाहणार आहोत.
-
१) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युनिव्हर्सल बॉस या नावाने ओळखला जाणारा ख्रिस गेल अपेक्षेप्रमाणे या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर सध्या ३२६ षटकार जमा आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे गेलच्या मागे असणाऱ्या फलंदाजांची कामगिरी पाहिली की अजुन तरी त्याच्या अव्वल स्थानाला धोका नसल्याचं लगेच कळून येतं.
-
२) एबी डिव्हीलियर्स – २१२ षटकार
-
३) महेंद्रसिंह धोनी – २०९ षटकार
-
४) रोहित शर्मा – १९४ षटकार
-
५. सुरेश रैना – १९४

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS