-
लॉकडाउनकाळात ज्याप्रमाणे इतर क्रीडा स्पर्धांना फटका बसला तसात तो महाराष्ट्रातील कुस्ती या खेळालाही बसला. प्रादूर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रातले कुस्ती फड सुमारे ४ महिने बंद ठेवण्यात आले होते.
-
परंतू अनलॉकच्या काळात आता सर्व नियमांचं काटेकोर पालन करत कुस्तीचे फड पुन्हा एकदा उघडले आहेत. पुण्यातील धनकवडी येथील मामासाहेब कुस्ती संकुलातील पैलवानांनी नित्य-नेमाने सरावाला सुरुवात केली आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगेरे)
-
महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे. कोल्हापूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, पुणे ग्रामीण या भागांमध्ये आजही अनेक कुस्तीपटू या खेळात आपली कारकिर्द घडवण्यासाठी झटत असतात.
-
मुळचा बीडचा असलेला आणि महाराष्ट्र केसरीचं उप-विजेतेपद पटकावणारा अक्षय शिंदेही मामासाहेब संकुलात आपल्या सहकाऱ्यांसोबत सराव करत आहे.
-
लॉकडाउनच्या काळात सराव नसल्यामुळे आपल्यासह अनेक मल्लांची जाडी वाढली आहे. अनेकांचं वजन वाढलेलं असल्याचं अक्षयने सांगितलं.
-
त्यामुळे हे वजन नियंत्रणात आणण्यासाठी सर्व खबदरादी घेऊन रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं असल्याचंही अक्षयने सांगितलं.
-
लाल माती आणि पैलवान यांचं नात हे महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही…
-
पण सरावाला सुरुवात करण्याआधी…थोडी कसरत झाली पाहीजे की नको??
-
तालमीतली माती तुडवताना मल्ल…
-
काही मल्ल तालमीमधील माती रोलरने सारखी करतात तर काही मल्ल सरावाला सुरुवात करतात…
-
अंगावर माती पडली, बजरंगबली की जय असं म्हटलं की सर्व पैलवानांच्या अंगात स्फुरणं चढतं. मग सुरु होते समोरच्या खेळाडूला मात देण्यासाठी धडपड…
-
सरावाअंती एखाद्या मल्लाला असा धोबीपछाड दिला जातो.
-
सराव झाल्यानंतर या मल्ल्यांच्या चेहऱ्यावरच हसू बरंच काही सांगून जातं.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली