१९ सप्टेंबर रोजी आयपीएलच्या १३ व्या सत्राचा शुभारंभ होणार आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमिवर यंदाची आयपीएल स्पर्धा दुबईमध्ये होत आहे. आयपीएलचे ८ संघ दुबईमध्ये दाखल झाले आहेत. सर्व संघानी सरावाला सुरुवातही केली आहे. या सत्रात विराट कोहली, महेंद्र सिंह धोनी, रोहित शर्मा, स्मिथ, डेविड वार्नर, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि दिनेश कार्तिक यांच्याकडे संघाचं नेतृत्व आहे. पाहूयात आयपीएलमध्ये कोणत्या कर्णधाराला किती मानधन मिळते… आरसीबीचं नेतृत्व विराट कोहलीकडे आहे. या संघाला आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलं नाही. २००९ आणि १०१६ मध्ये या संघाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विराट कोहलीने वर्षाभरासाठी १७ कोटी रुपयांचा करार केला आहे. इतर कर्णधारापेक्षा ही रक्कम जास्त आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये चेन्नईला जेतेपद मिळवून दिलं आहे. धोनीला १३ व्या सत्रासाठी १५ कोटी रुपयांत करारबद्ध करण्यात आलं आहे. आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये रोहित शर्माचं नाव घेतलं जातं. रोहितच्या नेतृत्वात मुंबईनं २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएल चषकावर नाव कोरलं आहे. जगातील सर्वात विस्फोटक सलामी फलंदाजाला आयपीएलच्या १३ व्या सत्रासाठी १५ कोटी रुपयांत करारबद्ध करण्यात आलं आहे. सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार वार्नरने संघाला २०१६ मध्ये चषक जिंकून दिला आहे. वॉर्नरला १२.५ कोटी रुपयांत करारबद्ध करण्यात आलं आहे. यंदा पन्हा एकदा राजस्थन संघाची धुरा स्टीव स्मिथच्या खांद्यावर आहे. राजस्थानने स्मिथला १२ कोटी रुपयांत करारबद्ध केलं आहे. पंजाब संघासाठी पहिल्यांदाच केएल राहुल कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे. राहुलला ११ कोटी रुपयांत करारबद्ध करण्यात आलं आहे. दोन वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या केकेआर संघाचं नेतृत्व यंदा दिनेश कार्तिककडे आहे. कार्तिकला यंदाच्या सत्रात ७.४ कोटी रुपयात करारबद्ध करण्यात आलं आहे. युवा श्रेयस अय्यरकडे दिल्ली डेयरडेविल्स संघाचं नेतृत्व आहे. अय्यरला ७ कोटी रुपयांत करारबद्ध करण्यात आलं आहे.

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…