-
गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ५ विकेटने पराभवाची धूळ चारत चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात धडाकेबाज विजयाने केली आहे. अंबाती रायुडू आणि डु प्लेसिस यांची अर्धशतकं हे चेन्नईच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. पाहूयात या सामन्यातले काही महत्वाचे क्षण… (छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)
-
नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांची पहिल्या विकेटसाठी आश्वासक सुरुवात.
-
पियुष चावलाने रोहित शर्माला माघारी धाडत मुंबईची जोडी फोडली. पाठोपाठ क्विंटन डी-कॉकही माघारी परतला.
-
मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांकडून निराशा, सौरभ तिवारीच्या ४२ धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांची हाराकिरी…
-
चेन्नईची सुरुवातही अडखळतच…सलामीवीर मुरली विजय आणि शेन वॉटसन स्वस्तात माघारी
-
अंबाती रायुडू आणि फाफ डु-प्लेसिस यांच्यात महत्वपूर्ण शतकी भागीदारी….मुंबई इंडियन्स बॅकफूटवर
-
अर्धशतकवीर रायुडू राहुल चहरच्या गोलंदाजीवर बाद….ठराविक अंतराने जाडेजाही माघारी, सामन्यात रंगत निर्माण
-
धोनीच्या जागी संधी मिळालेल्या सॅम करनची फटकेबाजी, चेन्नई सुपरकिंग्ज विजयाच्या जवळ….
-
सॅम करन माघारी, धोनी मैदानात…
-
डु-प्लेसिसचे लागोपाठ दोन चौकार आणि चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यात ५ गडी राखून विजयी

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”