-
आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने धडाकेबाज सुरुवात केली. सनराईजर्स हैदराबाद संघावर १० धावांनी मात करत RCB ने पहिला सामना जिंकला. (सर्व छायाचित्र सौजन्य – IPL/BCCI)
-
एकाच षटकात युजवेंद्र चहलने बेअरस्टो आणि विजय शंकर यांचा घेतलेला बळी आणि मोक्याच्या क्षणी फलंदाजांनी केलेली हाराकिरी यामुळे हैदराबादने हातातला सामना गमावला.
-
RCB कडून फलंदाजीत देवदत पडीक्कलने दिवस गाजवला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या पडीक्कलने ४२ चेंडूत ८ चौकारांनिशी ५६ धावा केल्या.
-
सलामीच्या जोडीसाठी पडीक्कलने फिंचसोबत ९० धावांची भागीदारीही केली.
-
पडीक्कलच्या स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीवर आज आपण एक नजर टाकणार आहोत…
-
वयाच्या नवव्या वर्षापासून देवदत पडीक्कलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
-
देवदतचा जन्म केरळमधला…पण त्याने क्रिकेट खेळायला कर्नाटकात सुरुवात केली.
-
फर्स्ट क्लास क्रिकेट, लिस्ट A क्रिकेट आणि आयपीएल अशा तिन्ही महत्वाच्या स्पर्धांमध्ये पडीक्कलने पदार्पणाच्या सामन्यांत अर्धशतक झळकावलं आहे.
-
लिस्ट A क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या मालिकेतच देवदतने ६०९ धावा काढत मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचा बहुमान मिळवला होता.
-
भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारांत १ हजार धावांचा टप्पा गाठणारा देवदत पहिला खेळाडू आहे.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’