-
-
IPL 2020मधील पंजाबविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने खूपच सुमार कामगिरी केली.
-
लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिचा उल्लेख केला.
-
“ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हणत त्यांनी अनुष्काचं नाव घेतलं.
-
गावसकर यांनी अशाप्रकारे उपरोधिक टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली आणि तिने त्यांना सडेतोड उत्तर दिलं.
-
इतर खेळाडूंच्या कामगिरीसाठी त्यांच्या जोडीदारांना नावं ठेवली जात नाहीत. तशी वागणूक मला केव्हा मिळणार? मी अपेक्षा करते की पुढच्या वेळी तुम्ही विराटच्या खेळीचं वर्णन करताना माझा संदर्भ येऊ देणार नाही", अशा स्पष्ट शब्दात अनुष्काने गावसकर यांना सुनावलं.
-
विराटच्या खेळीसाठी किंवा कामगिरीसाठी अनुष्कावर टीका करणं किंवा तिला ट्रोल करणं हे काही तिच्यासाठी नवीन नाही. आधीही विराटच्या कामगिरीमुळे अनुष्काला ट्रोल करण्यात आलं आहे.
-
भारतीय संघाला २०१४मध्ये इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी अनुष्का-विराट यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा होती. त्यामुळे विराटच्या कामगिरीमुळे अनुष्का ट्रोल झाली होती.
-
त्याच दौऱ्यावर वन डे मालिकेत विराट शून्यावर बाद झालेला असतानाही चाहत्यांनी अनुष्काला ट्रोल केलं होतं.
-
२०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ खेळत होता. वन डे विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताला सिडनीच्या मैदानावर हार पत्करावी लागली होती. त्यावेळी अनुष्कामुळे विराटचं खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका काही लोकांनी केली होती.
-
२०१८ साली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात क्रिकेट मालिका सुरू होती. या मालिकेतील एका सामन्यात विराट केवळ ५ धावा काढून बाद झाला. अनुष्का त्यावेळी स्टेडियममध्येच होती त्यामुळे तिला टीकेचं लक्ष्य करण्यात आलं होतं.

Maharashtra Heavy Rain Alert : मुंबईची लाईफलाइन कोलमडली; मध्य रेल्वे ठाण्यापर्यंतच, हार्बर रेल्वे कासवगतीने चालू