-
मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक असणारा झहीर खान याचा आज ४२ वा वाढदिवस. क्रिकेटच्याबरोबरीने झहीरचा वयैक्तीत आयुष्यही नेहमीच चर्चेत असतं. झहीरचं अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत २०१७ साली लग्न झालं. जाणून घेऊया त्यांच्या सुखी संसाराबद्दल. ( सर्व फोटो सौजन्य – सागरिका घाटगे इन्स्टाग्राम)
-
नेहमीच काही जोडपी चर्चेत असतात भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे अशाच जोडप्यांपैकी एक आहे.
-
‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने सागरिका घाटगेला अभिनेत्री म्हणूव ओळख मिळवून दिली.
-
‘चक दे इंडिया’तील भूमिकेसाठी सागरिकाला स्क्रीनचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
-
नोव्हेंबर २०१७ मध्ये सागरिकाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान बरोबर लग्न केले.
-
अतिशय शांत स्वभाव असलेला झहीर आणि त्याच्या अगदी उलट असलेली सागरिका यांची प्रेमकहाणीसुद्धा रंजक आहे.
-
सागरिका आणि झहीरची ओळख अंगद बेदी आणि इतर काही मित्रांमुळे झाली. त्यानंतर दोघांनी जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केले.
-
माझ्या कुटुंबियांनी सर्वप्रथम ‘चक दे इंडिया’ ची सीडी मागवली. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला असे झहीरने एका मुलाखतीत सांगितले होते.
-
झहीर नेहमीच सागरिकाला पाठिंबा देत असतो. आता त्यांचा संसार सुखाने सुरु आहे.
-
शाहरुखसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सागरिकाने ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
तिने अतुल कुलकर्णीसोबत ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे.
-
सागरिकाने अभिनेत्री बनण्याआधी मॉडेल म्हणूनही काम केले. ‘चक दे इंडिया’मध्ये तिने प्रीती सबरवालची भूमिका रंगवली असली तरी, राष्ट्रीय स्तरावरची क्रीडापटूही आहे.
-
सागरिका घाटगे कोल्हापूरमधील राजघराण्याशी संबंधित आहे. विजयसिंह घाटगे आणि उर्मिला घाटगे ही तिच्या आई-वडिलांची नावे आहेत.
-
वयाच्या आठव्या वर्षापर्यंत सागरिका कोल्हापूरमध्ये होती. त्यानंतर राजस्थान अजमेरमधील मायो कॉलेज गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आले.
-
सागरिकाच्या आजी इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या तृतीय कन्या आहेत. सागरिकाला एक भाऊ असून ती राष्ट्रीय स्तरावरची हॉकीपटू आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग