-
Happy Birthday Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आसतोच. पांड्या आपल्या खेळासोबतच खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. टीम इंडियाचा पोस्टर बॉय पांड्याचा हार्दिक पांड्याचा आज वाढदिवस आहे. पांड्यानं अतिशय हालाखीच्या परिस्थितीत दिवस काढले आहेत. एकवेळ बॅट घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. पण हार्दिक आज कोट्यवधींची कमाई करतो… जाणून घेऊयात हार्दिकबद्दल…
११ ऑक्टोबर १९९३ रोजी हार्दिकचा जन्म गुजरातमध्ये झाला. हार्दिकला आज भारतीय संघातील सर्वात डॅशिंग क्रिकेटपटू म्हणून ओळखलं जातं. गरीब घरातून आलेल्या पांड्यानं आपल्या हिंमतीवर आज श्रीमंतीचं आयुष्य जगत आहे. हार्दिक पांड्या सध्या कोट्यवधी रुपये कमवत असला तरी एकवेळ त्याच्याकडे पैसेही नव्हते. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या दोघांना क्रिकेटची आवड होती, मात्र क्रिकेट किट घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैस नव्हते. एककाळ असा होता की हार्दिक पांड्याने मॅगी खाऊन दिवस काढले आहेत. कृणाल पांड्याने एका मुलाखतीत सांगितले की, हालाखीच्या परिस्थितीमुळे क्रिकेट कीट घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी एक चांगली बॅट घेण्यासाठी सात ते आठ हजार रुपये लागत होते. तेवढे पैसेही नव्हते. त्यावेळी पांड्याकडे एक बॅट होती जी इरफान पठाणने त्याला भेट म्हणून दिली होती. परिस्थिती खराब असल्यामुळे हार्दिक पांड्याला नववीतूनच शिक्षण सोडून द्यावं लागलं होतं. एकवेळ अशी होती जेव्हा पांड्यानं मॅगी खाऊन दिवस काढले होते. हार्दिकनं स्वत: पोस्ट करत क्रिकेट खेळण्यासाठी ट्रकनं जावे लागायचे असे सांगितले होते. पण सध्या हार्दिक कोट्यवधी रुपयांची कमाई करतोय. हार्दिकला बीसीसीआयकडून वर्षाला तीन कोटी रुपये पगार दिला जातो. तर, 2020मध्ये मुंबईनं हार्दिकला ११ कोटी रुपयांत रिटेन केलं आहे. याशिवाय जाहिरातीमधूनही बक्कळ पैसा हार्दिकला मिळतो. २०१९ मध्ये फॉर्ब्स सेलिब्रिटी टॉप १०० श्रीमंतांमध्ये हार्दिक सामिल झाला होता. फोर्ब्सच्या माहितीनुसार २०१९ मध्ये त्याची एकूण कमाई २४.८७ कोटी रूपये होती. एवढेच नाही तर हार्दिक पांड्याकडे हिऱ्याची चेन, कोट्यावधींच्या गाड्याही आहेत. पांड्याकडे पाटेक फिलिपची पर्पेचुअल कॅलेंडर 5740/1G घड्याळ आहे. ज्याची सध्याची किंमत ८५ लाख आहे. भारतात हे घड्याळ मिळत नसल्यामुळे त्याची किंमत एक कोटी १० लाख आहे. (सर्व छायाचित्र हार्दिक पांड्याच्या इन्स्टाग्रामवरुन घेतेली आहेत.)

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा