-
अनुभवी शिखर धवनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करत दिल्ली कॅपिटल्सचा डाव सावरण्यात मदत केली आहे. (फोटो सौजन्य – IPL)
-
पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे हे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर शिखरने श्रेयस अय्यरच्या साथीने संघाचा डाव सावरला.
-
३३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह शिखर धवनने ५७ धावा केल्या. श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो माघारी परतला.
-
आयपीएलच्या इतिहासातलं शिखर धवनचं हे ३९ वं अर्धशतक ठरलं. विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना यांच्या नावावर आयपीएलमध्ये ३८ अर्धशतकं जमा आहेत.
-
आपल्या अर्धशतकी खेळीत शिखरने ६ चौकार लगावले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रमही शिखरच्या नावावर आहे. त्याने ५४९ चौकार लगावले आहेत.
-
याचसोबत राजस्थान रॉयल्सविरुद्ध धवनचं हे सहावं अर्धशतक ठरलं. या यादीत एबी डिव्हीलियर्स ७ अर्धशतकांसह शिखरच्या पुढे आहे.

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”