-
IPLमध्ये रविवारी बंगळुरू vs चेन्नई आणि मुंबई vs राजस्थान यांच्यातील सामने रंगतदार झाले. त्यातच या सामन्यांना एका खास कारणास्तव 'ग्लॅमरस टच' मिळाला.
-
बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने ८ गडी राखून सहज विजय मिळवला.
-
तर मुंबईविरूद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने शानदार शतक झळकावत संघाचं स्पर्धेतील आव्हान कायम राखलं.
-
या सामन्यांसाठी बंगळुरू आणि मुंबईच्या डग आऊटमध्ये खेळाडूंच्या जोडीदारांनी हजेरी लावली.
-
विराट कोहलीची सहचारिणी अनुष्का शर्मा सामन्यासाठी उपस्थित होती.
-
टाळ्या वाजवून ती संघाला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसली.
-
यु-ट्युब स्टार आणि युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मादेखील RCBची खास हिरवी जर्सी परिधान करून सामन्यासाठी हजर होती.
-
एक महिला आणि अनुष्का यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्याचं दिसलं.
-
ती महिलादेखील एका क्रिकेटपटूची पत्नी आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादव याची पत्नी तानया वाधवादेखील स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आली होती.
-
याशिवाय, दुसऱ्या सामन्यात माजी गोलंदाज आणि सध्याचा मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक झहीर खान याची पत्नी अभिनेत्री सागरिका घाडगे हिनेदेखील हजेरी लावली.

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…