-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३२ वा वाढदिवस. विराट हा मैदानावर आणि मैदानाबाहेर कायमच चर्चेत असतो. विराटबरोबरच त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही कायमच चर्चेत असते.
-
विराट आणि अनुष्का हे दोघे जेव्हा जेव्हा सार्वजनिक जिवनामध्ये एकत्र दिसतात तो चर्चेचा विषय ठरतो. कधी अनुष्का विराटच्या सामन्याला हजेरी लावते, तर कधी विराट अनुष्काच्या चित्रपटांची तोंडभरून कौतुक करतो. त्यामुळे हे दोघेही आपल्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतात.
-
विराट आणि अनुष्काची प्रेमकहाणीदेखील अनेकदा वेगवगेळ्या कारणांनी चर्चेत असते. प्रत्येक प्रेमकहाणीची पहिली भेट खास असते. ती भेट आयुष्यभर प्रत्येकाला लक्षात राहते. अशीच काही अविस्मरणीय भेट विराट आणि अनुष्काची होती.
-
विराट आणि अनुष्कादेखील पहिल्यांदा जेव्हा भेटले, तेव्हा त्यांच्यात नक्की काय संवाद घडला याबाबत विराटने वर्षभरापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.
-
अमेरिकेतील एका टीव्ही शोमध्ये विराटने अनुष्कासोबतच्या आपल्या पहिल्या भेटीबद्दलचं गुपित उघडं केलं होतं.
-
२०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीसाठी हे दोघे पहिल्यांदा भेटले.
-
त्या भेटीबाबत बोलताना विराटने, “मी पहिल्या वेळी जेव्हा अनुष्काला भेटलो, तेव्हा मी तिच्याशी गंमतीशीर पद्धतीने हलक्या फुलक्या शब्दामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला," असं सांगितलं.
-
"अनुष्काला पहिल्यांदा भेटतो तेव्हा मी खरं तर थोडा नर्व्हस होतो, म्हणून मी एक जोक क्रॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नक्की काय बोलावे, काय करावे हे मला कळत नव्हतं," असं विराट म्हणाला.
-
आपली पहिली भेटच शूटिंगच्या सेटवर झाल्याचे सांगताना विराटने, "मी शूटिंगच्या सेटवर होतो. मला तिच्यासोबत जाहिरातीचं शूटिंग करायचं होतं. त्यामुळे माझ्या मनात थोडी भीती नक्कीच होती,” अशी प्रांजळ कबुलीही दिली.
-
“अनुष्का जेव्हा शूटिंगसाठी आली, तेव्हा ती हिल्समुळे खूपच उंच दिसत होती," अशी आठवण विराटने सांगितली.
-
"ती हिल्स घालून आल्यावर मी तिला म्हटलं की तू माझ्यापेक्षाही उंच दिसते आहेस. त्यावर तिने मला सांगितलं की मी काही ६ फूट वगैरे उंच नाही. मी हिल्समुळे इतकी उंच दिसत आहे असं उत्तर अनुष्काने मला दिलं होतं," असंही विराट म्हणाला.
-
अनुष्काने दिलेल्या उत्तरावर विराटने तिला, "तुला आणखी उंच हिल्सच्या चपला मिळाल्या नाहीत का?," असा प्रश्न विचारला.
-
खरं तर विराटने अगदी लाइट मोडवर म्हणजेच गंमतीशीरपद्धतीने प्रश्न विचारला होता मात्र अनुष्काला ते फारसं आवडलं नाही.
-
"मी तिला ते गंमतीत म्हटलं होतं. मला वाटलं की ते फारच गंमतीशीर आहे, पण खरं तर मी तसं बोलायला नको होतं असं मला नंतर वाटलं," असंही कोलही या प्रसंगाबद्दल बोलताना म्हणाला.
-
विराटने विचारलेल्या खोचक प्रश्नानंतर अनुष्का थोडी चिडल्याचं आपल्याला जाणवलं असंही विराट म्हणाला.
-
"त्यानंतर ती थोडी चिडल्यासारखी वाटली, पण मी गंमतीत ती गोष्ट बोललो हे मी तिला लगेच सांगितलं," असं विराट म्हणाला.
-
"मी केलेला विनोदाचा प्रयत्न फसल्याचे जाणवल्यानंतर मलाच फार अवघडल्यासारखं झालं," असं विराटने ती आठवण सांगताना नमूद केलं.
-
"तिला शूटिंगची सवय होती, पण मला तसा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे मी त्या वेळी थोडासा मूर्खच ठरलो”, असं विराटने कबुल केलं.
-
लग्नाचं पूर्ण प्लॅनिंगदेखील अनुष्काने केलं होतं आणि तिने ते सगळं अत्यंत गोपनीय ठेवलं होतं, हे देखील कोहलीने या मुलाखतीत नमूद करत अनुष्काला शब्बासकी दिली.
-
११ डिसेंबर २०१७ रोजी हे दोघं लग्नाच्या बेडीत अडकले.
-
विराट आणि अनुष्काच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असून त्यांनीच काही आठवड्यांपूर्वी ही गुड न्यूज सोशल नेटवर्किंगवरुन चाहत्यांसोबत शेअर केली.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…