-
IPL 2020 Playoffs च्या पहिल्या सामन्यात मुंबईने दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज विजय मिळवला आणि सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
-
इशान किशन (५५*), सूर्यकुमार यादव (५१) आणि हार्दिक पांड्या (३७*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती.
-
या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं कंबरडं मोडलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला.
-
२०१ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच दिल्लीला दोन धक्के बसले. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे दोघेही शून्यावर माघारी परतले.
-
महत्त्वाच्या सामन्यात स्वस्तात बाद होण्याची ही पृथ्वी शॉ ची पहिलीच वेळ नव्हती. यंदाच्या हंगामात अनेकदा तो स्वस्तात माघारी परतला आहे.
-
बाद फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात पृथ्वी शॉ ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला.
-
यंदाच्या हंगामात पृथ्वी शॉ ने १३ सामन्यात केवळ २ अर्धशतकं झळकावत २२८ धावाच केल्या आहेत.
-
त्याच्या याच खेळावर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर प्रचंड चिडल्याचे दिसून आले. त्यांनी ट्विट करून आपला राग व्यक्त केला.
-
"प्रिय पृथ्वी शॉ, असे फटके खेळायचा प्रयत्न करू नकोस जे फटके खेळणं खरोखर शक्यच नाहीये. जमत नसलेल्या गोष्टी करू नये", असे ते ट्विटद्वारे म्हणाले.
-
"विरेंद्र सेहवागला तुझा आदर्श मान. सेहवागने ज्या फटक्यावर पूर्णपणे नियंत्रण आणि विश्वास असेल असेच फटके खेळले आणि चांगली कारकिर्द घडवली. त्याच्याकडून काहीतरी धडा घे!", असे सल्ला ट्विटमधून मांजरेकर यांनी पृथ्वी शॉ ला दिला.

IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: अभिषेक, सूर्यानंतर गिल परतला तंबूत! टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या