-
प्ले-ऑफ्सच्या Qualifier 2मध्ये दिल्ली कॅपिटल्सने अप्रतिम लयीत असलेल्या हैदराबाद संघाला पराभवाची धूळ चाखण्यास भाग पाडले. (सर्व फोटो- IPL.com)
-
काही महत्त्वाच्या खेळी आणि त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी याच्या बळावर दिल्लीच्या संघाने विजय मिळवत पहिल्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
-
मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघापुढे अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सचे आव्हान असणार आहे.
-
दिल्लीकडून अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी करत संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले आहे.
-
अशा परिस्थितीत दिल्लीचे ५ महत्त्वाचे खेळाडू मुंबई इंडियन्सच्या संघावर भारी पडू शकतात.
-
कगिसो रबाडा- आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज १६ सामन्यात २९ गडी बाद करून स्पर्धेत अव्वलस्थानी विराजमान आहे. पर्पल कॅप परिधान केलेल्या या गोलंदाजाने यंदाच्या हंगामात दोन वेळा एकाच डावात ४ गडी बाद करण्याची किमया साधली आहे.
-
मार्कस स्टॉयनीस- ऑस्ट्रेलियाचा हा तडाखेबाज अष्टपैलू खेळाडू दिल्लीसाठी अनेक सामन्यात तारणाहार ठरला आहे. १६ सामन्यात याने ३५२ धावा कुटल्या आहेत. तसेच मोक्याच्या क्षणी गोलंदाजी करत १२ गड्यांनीही माघारी धाडलं आहे.
-
शिखर धवन- भारताचा 'गब्बर' फलंदाज सध्या तुफान लयीत आहे. यंदाच्या हंगामात सलग दोन शतकं लगावण्याचा इतिहास त्याने रचला आहे. याशिवाय हंगामात ४ अर्धशतके ठोकून ६००चा टप्पाही त्याने नुकताच पार केलेला आहे.
-
शिमरॉन हेटमायर- वेस्ट इंडिजच्या या डावखुऱ्या फलंदाजामध्ये सामना फिरवण्याचं सामर्थ्य आहे. हेटमायरने ११ सामन्यात १५०च्या स्ट्राईक रेटने १२ षटकारांच्या मदतीने १८० धावा केल्या आहेत.
-
श्रेयस अय्यर- कर्णधार म्हणून आपल्या संघाचे उत्तमपणे नेतृत्व करत असलेला श्रेयस फलंदाज म्हणूनही दमदार कामगिरी करत आहे. १६ सामन्यात २ अर्धशतकांसह त्याने ४५४ धावा ठोकल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याने गोलंदाजीत केलेले बदलदेखील परिणामकारक ठरताना दिसले आहेत.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…