मुंबई आणि दिल्ली आयपीएल जेतेपदासाठी आमनेसामने आले आहेत. १० तारखेला दोन्ही संघामध्ये आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. युएईमध्ये रंगलेल्या १३ व्या हंगामात आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आपली चमक दाखवली आहे. विंडिजचा महान माजी खेळाडू ब्रायन लारा यांनी आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट भारतीय युवा खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये ८ संघातील सहा खेळाडूंचा समावेश आहे. या सहा युवा भारतीय खेळाडूंनी ब्रायन लारा यांचं मन जिंकलं आहे. यांच्या चमकदार कामगिरीपाहून ब्रायन लारा प्रभावित झाला आहे. पाहूयात कोणत्या खेळाडूनं लाराला प्रभावित केलं आहे…. संजू सॅमसन – राजस्थानच्या संजू सॅमसननं यंदाच्या स्पर्धेत तुफान फटकेबाजी केली. या हंगामातील पहिल्या दोन सामन्यातच सॅमसनने १६ षटकार लगावले आहेत. सुर्यकमार यादव – मुंबई इंडियन्सच्या सुर्यकुमार यादवनं यंदा ४१.९० च्या सरासरीनं १५ सामन्यात ४६१ धावा केल्या आहेत. सुर्यकुमार यादव माझा आवडता खेळाडू असल्याचं लारा म्हणाला आहे. सुर्यकुमारची फलंदाजी मी एन्जॉय करतो. देवदत्त पडीकल – यंदा आरसीबीकडून सर्वाधिक धावसंख्या देवदत्त पडीकलच्या नावावर आहेत. विराट कोहली आणि डिव्हिलिअर्स सारखे दिग्गज फलंदाज असतानाही पडीकलनं केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. पडीकलमध्ये खूप क्षमता आहे. त्यानं फक्त टी-२० न खेळता कसोटीमध्येही आपली क्षमता सिद्ध करावी, असंलारा म्हणाला आहे. -
पंजाबचा कर्णधार राहूलनेही लाराला प्रभावित केलं आहे.
भारताचा माजी अंडर-१९ चा कर्णधार आणि हैदराबाद संघातील युवा खेळाडू प्रियम गर्गनेही लाराचं मन जिंकलं आहे. जम्मू काश्मीरमधील अष्टपैलू खेळाडू अब्दुल समदच्या कामगिरीमुळे लारा प्रभावित झाला आहे. हैदराबाद संघाकडून खेळणारा समद यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक प्रभावी ठरणारा युवा भारतीय खेळाडू आहे. -
दोन दिवसांपूर्वी ब्रायन लाराने बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. लारा म्हणाला होता की, एकवेळ मी कपिल देव, जवागल श्रीनाथ आणि मनोज प्रभाकर यांचा सामना करेन…पण जसप्रीत बुमराहचा सामना करणं मी पसंत करणार नाही. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर हे दोन गोलंदाज जर ७० ते ९० किंवा अगदी २००० सालात क्रिकेट खेळत असते तर त्यांचं नाव आज खूप मोठं झालं असतं.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश