-
आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आला, मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत स्पर्धेचं विजेतेपदही पटकावलं. यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. सर्व भारतीय खेळाडू युएईत Bio Secure Bubble मध्ये आले असून ते बुधवारी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. (सर्व फोटो सौजन्य – BCCI)
-
IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्याकडून भारतीय संघाला यंदा मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
-
२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या या दौऱ्याला सुरुवात होणार असून या मालिकेत भारतीय संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे.
-
कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परतणार आहे.
-
फेब्रुवारी महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा आटपून भारतात परतला. मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थीती लक्षात घेता बीसीसीआयने हा दौरा रद्द केला. यानंतर तब्बल ९ महिन्यांच्या कालावधीने भारतीय संघ आपला पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करणार आहे.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला