भारताचा फिरकीपटू रविंद्र जाडेजा आज, ३२ वा वाढदिवस आहे. अष्टपैलू खेळीनं सर्वांची मनं जिंकणाऱ्या जाडेजाला दुखापतीमुळे उर्वरीत दोन्ही सामन्यातून आराम देण्यात आला आहे. जाडेजानं आपल्या अष्टपैलू खेळीनं अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे. जाणून घेऊयात बर्थ-डे बॉय जाडेजाविषयी…. ६ डिसेंबर १९८८ रोजी रविंद्र जडेजाचा जन्म सौराष्ट्रमधील नवागाम-खेड येथे झाला आहे. वडील अनिरुद्ध सिंग हे सिक्यूरिटी गार्ड होते, तर आई लता या नर्स होत्या. जाडेजानंने आत्तापर्यंत ४९ कसोटी सामने खेळले असून यात १८६९ धावा आणि २१३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १६८ एकदिवसीय सामन्यात २४११ धावा आणि १८८ विकेट्स घेतल्या आहेत. तर ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २१७ धावा आणि ३९ विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय संघातील खेळाडूंनी जाडेजाला 'जड्डू' हे टोपननाव दिलं आहे. धोनीने सोशल मीडियावर अनेक ट्विट करुन जडेजाला 'सर' हे टोपननाव दिले आहे. -
जाडेजाच्या वडिलांची इच्छा होती की त्याच्या मुलाने आर्मी शाळेत शिक्षण घ्यावे. व लष्करात भर्ती व्हावं. पण आईने त्याला क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी पाठिंबा दिला.
२००५ मध्ये एका अपघातामध्ये जाडेजाच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यानं क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. २००८ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात जाडेजा उपकर्णधार होता. या विश्वचषकात विराट कोहलीनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. विशेष म्हणजे, २००६ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात ही जाडेजानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या संघात रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराही होते. रविंद्र जाडेजा आणि रिवा सोळंकी यांनी २०१६ मध्ये राजकोटमध्ये लग्न केलं होतं. जाडेजाचं लग्न वादग्रस्त झालं होतं. या लग्नात गोळ्याची फायरिंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. २०१७ मध्ये जाडेजा-रिवा यांना एक कन्यारन्त प्राप्त झाले. त्यांनी मुलीचे नाव निध्याना असे ठेवले आहे. जाडेजाला घोडस्वारीची आवड आहे. जमनागरजवळील फार्महाऊसवर तो घोडस्वारी करत असल्याचे अनेक समोर आले आहेत. -
जड्डू फूड फिल्ड नावाचे जाडेजाचे राजकोटमध्ये रेस्टोरंट आहे.

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम