ऑस्ट्रेलिया संघाचा २-१ पराभव करत भारतीय संघानं टी-२० मालिकेवर नाव कोरलं. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघानं मालिका जिंकली आहे. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर पिछाडीवर असणाऱ्या भारतीय संघानं टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. शिखर धवन, हार्दिक पांड्या, विराट कोहली आणि नटराजन यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रलियाचा पराभव केला. मर्यादित षटकांच्या सामन्यानंतर कसोटी संघाचा भाग नसणारे खेळाडू मायदेशी परतले आहेत. यामध्ये शिखर धवनचाही समावेश आहे. मायदेशी परतत असताना शिखर धवन यानं चहल आणि चहर यांच्यासोबतचा विमानातील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत असताना धवननं 'आंखें निकाल कर गोटियां खेलला हूँ गोटियां' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. नेटकऱ्यांना फोटो आणि कॅप्शन आवडले. -
पण एका युजर्सनं धवनच्या फोटोवर आपत्तीजनक कमेंट केली…
धवननेही या कमेंटला आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. हो, तुझ्या घरचेही तुझ्याबाबात असेच म्हणतात…. असं भन्नाट उत्तर धवनने त्या युझर्सला दिलं. -
धवनच्या उत्तरानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याच्या उत्तराचं कौतुक होत आहे….

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली