पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहाणीकारक पराभवला सामोरं जावं लागलं. पहिल्या डावात आघाडी असतानाही अवघ्या ३६ धावसंख्येवर भारताचा डाव आटोपला. दुसऱ्या ऑस्ट्रेलियापुढे अवघं ९० धावांचं आवहन ठेवण्यात आलं. ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात हे सोपं लक्ष पार केलं. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे चार कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ ०-१ नं पिछाडीवर आहे. २६ डिसेंबर रोजी भारताचा पुढील सामना होणार आहे. मेलबर्न येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघासमोर अडचणी वाढल्या आहेत. मेलबर्न येथे होणाऱ्या सामन्यात भरातीय संघात चार बदल होण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली मायदेशी परतला आहे. तर वेगवान गोलंदाज शमी दुखपतग्रस्त आहे. पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी करत असताना पॅटिन्सचा एक उसळता चेंडू शमीच्या मनगटावर लागला. त्यामुळे हात फ्रॅक्चर झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि शमी यांचा पर्याय शोधावा लागेल. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार चार बदल होण्याची शक्यता आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर के. एल राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुखापतग्रस्त शमीच्या जागी २६ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता. असं झाल्यास सिराज कसोटी संघात पदार्पण करेलं. दोन सराव सामन्यात सिराजनं ५ विकेट घेतल्या आहेत. खराब फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉला दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याच्याजागी शुबमन गिलला संधी मिळण्याची शक्यता क्रीडा विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. दोन्ही डावात शॉ अपयशी ठरला आहे. साहाच्या जागेवरही ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साहा फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. पंतने सराव सामन्यात शतक झळकावलं होतं. अष्टपैलू रविंद्र जाडेजा दुखापतीतून सावरला असून पुढील सामन्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जाडेजाला संधी देणार का? याबाबतचे औत्सुक्यही असणार आहे…

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली