-
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नुकतंच कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान पटकावलं. (सर्व फोटो – ट्विटर / ब्लॅककॅप्स, आयसीसी, सोशल मीडिया)
-
सध्या सुरू असलेल्या पाकिस्तानविरूद्धच्या कसोटीत त्याने ३६२ चेंडूत २८ चौकारांसह २३८ धावा केल्या. अडीचशे धावांचा टप्पा मात्र त्याला गाठता आला नाही.
-
केन विल्यमसनने संघाला पाचशेपार मजल मारून देणारी दमदार खेळी केली आणि याच खेळीच्या जोरावर त्याने अनेक विक्रम मोडले.
-
७००० – केन विल्यमसनने कसोटी क्रिकेटमध्ये १४४ डावांत ७ हजार धावांचा टप्पा गाठला. न्यूझीलंडकडून सर्वात कमी डावांमध्ये हा पराक्रम करण्याचा बहुमान त्याने पटकावला. याआधी १६९ डावांत रॉस टेलरने हा टप्पा गाठला होता. त्याने माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगला मागे टाकलं होतं.
-
२+१ – सलग तीन कसोटी सामन्यात दोन द्विशतकं आणि एक शतक मारण्याचा पराक्रम विल्यमसनने केला. सर्वप्रथम त्याने वेस्ट इंडिजच्या विरूद्धच्या कसोटी सामन्यात २५१ धावांची खेळी केली. त्यानंतर पाकिस्तान विरोधात पहिल्या कसोटीत १२९ तर दुसऱ्या कसोटीत २३८ धावा कुटल्या.
-
१३ – पाकिस्तानविरोधात पहिल्या डावात त्याने लगावलेले शतक हे त्याचे २४ वे कसोटी शतक ठरले. न्यूझीलंडच्या भूमीवरील ते सर्वाधिक १३वे शतक ठरले. त्याने रॉस टेलरचा १२ शतकांचा विक्रम मोडला. त्यानंतर याच डावात त्याने शतकाचे द्विशतकात रूपांतर केले.
-
४ – विल्यमसनने पाकिस्तान विरूद्ध सामन्यात केलेली २३८ धावांची खेळी हे त्याचे चौथे कसोटी द्विशतक ठरले. याचसोबत न्यूझीलंडकडून सर्वाधिक चार कसोटी द्विशतकं ठोकणाऱ्या ब्रेंडन मॅक्कलमच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.
-
२ – कर्णधार म्हणून ३ हजार कसोटी धावांचा पल्ला गाठणारा विल्यमसन दुसराच खेळाडू ठरला. या आधी स्टीफन फ्लेमिंगने (५,१५६) हा पराक्रम केला होता.
-
१ – कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर २ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विल्यमसन पहिला खेळाडू ठरला. आधी फ्लेमिंगच्या सर्वाधिक १,८४२ धावा होत्या.
-
५६ – न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेट खेळताना सर्वाधिक ५६ वेळा विल्यमसनने ५०+ धावसंख्या उभारली आहे. आधी फ्लेमिंगने ५५ वेळा ही किमया साधली होती.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…