-
प्रदीर्घ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारातला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. एकापाठोपाठ एक भारतीय खेळाडू दुखापतीमुळे बेजार झाले आहेत..प्रमुख खेळाडूंना होणाऱ्या दुखापतीचा परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीवर होत आहे.
-
एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर सराव करताना मुंबईकर श्रेअस अय्यरही दुखापतग्रस्त झाला. सध्या एनसीएमध्ये तो घाम गाळत आहे. दुखापतीमुळे श्रेयस मुश्ताक अली स्पर्धेतील साखळी सामन्याला मुकणार आहे.
-
पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना मोहम्मद शमीला दुखपत झाली होती. उसळता चेंडू लागल्यामुळे दुखपतग्रस्त झालेला शमी संपूर्ण मालिकेला मुकला.
-
शमीच्या दुखापतीमधून भारतीय संघ सावरतो ना सावरतो तोच उमेश यादवही दुखपतग्रस्त झाला. त्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेला मुकावं लागलं.
-
शमी, इशांत आणि उमेश यादव यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत झाली होती. वेगवान गोलंदाजीचा भार एकट्या बुमराहवर आहे. यातच भर म्हणून दुखापतीतून सावरलेला अष्टपैलू रविंद्र जाडेजाही तिसऱ्या सामन्यात बोटाला चेंडू लागल्यामुळे जखमी झाला अन् उर्वरीत कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे.
-
तिसऱ्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षक ऋषभ पंतलाही दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर नसल्याचे वृत्त असले तरी दुसऱ्या डावात यष्टीरक्षणासाठी साहा आला होता. त्यामुळे पंतची दुखापत किती गंभीर आहे हे वेळच सांगेल.
-
तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव करताना के. एल राहुललाही दुखपत झाली. त्यामुळे उर्वरीत कसोटी मालिकेला राहुल मुकला आहे.
-
दिग्गज वेगवान गोलंदाज इशांत शर्मालाही दुखापतमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आलं. बंगळुरु येथे एनसीएमध्ये दुखापतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी इशांतनं प्रयत्न केले. मात्र, अद्याप इशांत दुखापतीमधून सावरला नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होण्याआधीच भुवनेश्वर कुमारला दुखपत झाली होती. आयपीएलमधील सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही. आयपीएलमधील एक सामन्यादरम्यान हिटमॅन रोहित शर्मालाही दुखापत झाली होती. त्यामुळे टी-२०, एकदिवसीय मालिकेला रोहित शर्मा मुकला होता. शिवाय बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिले दोन सामनेही खेळता आले नव्हते.

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”