-
ऑस्ट्रेलियाविरोधात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे संघासोबत मायदेशी परतला आहे.
-
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ३२ वर्षांपासून अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या अजिंक्यने धूळ चारली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकत पराक्रम केला.
-
अजिंक्य रहाणे माटुंग्यामधील आपल्या घऱी पोहोचला तेव्हा त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.
-
ढोल-ताशाचा गजर आणि रेड कार्पेट अशा थाटात अजिंक्य रहाणेचं स्वागत करण्यात आलं.
-
कुटुंबीय तसंच शेजाऱ्यांनी केलेलं स्वागत पाहून अजिंक्य भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
-
“आज मला खरंच खूप आनंद होतो. माझ्यासाठी हा क्षण आनंददायी आहे. आमच्या या कामगिरीमागे सगळ्या देशवासियांचा हात आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाशिवाय हे शक्य नव्हतं,” अशा भावना यावेळी अजिंक्यने सांगितलं.
-
अजिंक्यने यावेळी बायकोने सांगितलेल्या एका गोष्टीचाही खुलासा केला.
-
पत्नी राधिकाने आपल्याला घरी येताना चांगले कपडे घालून ये असा सल्ला दिल्याचं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
-
अजिंक्यने सांगितलं की, "विमानतळावर असताना राधिकाने फोन करुन घरी येताना चांगले कपडे घालून घे, असं सांगितलं. मला काही कळेना की चांगली कपडे घातल्याने काय फरक पडेल? तिला मी जेव्हा विचारलं त्यावर तिने मला उत्तर दिलं की मुलगी आर्याला बरं वाटेल. ती आनंदी होईल… खूश होईल”.
-
दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यने मुलीला कडेवर घेतच जंगी स्वागताचा स्वीकार केला.

१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ