-
२०१९च्या विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. पण पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने धूळ चारली. भारतीय संघात त्यावेळी आपला वर्ल्ड कपमधील पदार्पणाचा सामना खेळणारा एक खेळाडू होता. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीराला माघारी धाडलं.
-
वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत धमाकेदार सुरूवात करणारा टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणजे विजय शंकर… दुसऱ्यांची विकेट काढणारा विजय प्रेमाच्या पिचवर मात्र 'क्लीन बोल्ड' झाला.
-
करोनाकाळात काही खेळाडूंनी साखरपुडा केला. त्यातच एक म्हणजे विजय शंकर. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली होती. विजय शंकर याने वैशाली विश्वेवरन हिच्यासोबत साखरपुडा केल्याची घोषणा आपल्या इन्स्टाग्रामवरून केली होती.
-
आपल्या साखरपुडा सोहळ्यातील काही क्षणचित्रे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. तर काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरही पोस्ट केलेली दिसले.
-
साखरपुड्यानंतर पाच महिन्यांनी आज तो विवाहबंधनात अडकला. टीम इंडिया आणि तामिळनाडू असे दोन्ही संघ सध्या क्रिकेट स्पर्धांच्यानिमित्त बायो-बबलमध्ये आहेत. त्यामुळे त्याच्या लग्नाला कोणीही क्रिकेटपटू उपस्थित राहू शकले नाहीत. पण सनरायझर्स हैदराबादने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या.
-
वैशालीशी लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच विजय शंकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. तो हैदराबादकडून IPL खेळताना दिसणार आहे. हैदराबादने त्याला संघात कायम राखले आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली