इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना आजपासून लॉर्ड्स येथे खेळला जाईल. न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. कॉनवे मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असून २००९मध्ये त्याने प्रथम श्रेणीमध्ये प्रवेश केला. काही वर्ष दक्षिण आफ्रिकेत खेळल्यानंतर तो २०१७मध्ये न्यूझीलंडला गेला. न्यूझीलंडमध्ये करिअर करण्यासाठी २९ वर्षीय कॉनवेने सप्टेंबर २०१७मध्ये जोहान्सबर्ग सोडले. कॉनवे दक्षिण आफ्रिकेत द्वितीय स्तराचे स्थानिक क्रिकेट खेळला, पण तिथे त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याने न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. कॉनवे वेलिंग्टन गेला आणि चित्रच पालटले. वेलिंग्टनकडून कॉनवेने १७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १५९८ धावा केल्या. कॉनवेची सरासरी ७२पेक्षा जास्त राहिली. कॉनवेला १०८प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे ज्यामध्ये त्याने ४७.२१च्या सरासरीने ७१३० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १८ शतके ठोकली आहेत. कॉनवेने न्यूझीलंडकडून १४ टी-२० सामन्यात ४७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तीन एकदिवसीय सामन्यात त्याने एक शतक आणि अर्धशतकासह २२५ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत स्थानिक क्रिकेट संधी नसल्यामुळे कॉनवे निराश झाला. त्याने फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये फारशी चांगली कामगिरी केली नाही, परंतु संधीही फारच कमी मिळाल्या. कॉनवे न्यूझीलंडकडून टी-२० मध्ये सलग पाच अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज आहे. मित्रांच्या सल्ल्यानुसार कॉनवे न्यूझीलंडला गेला. कॉनवेने न्यूझीलंडला जाण्यासाठी सर्वकाही विकले. कॉनवे एका मुलाखतीत म्हणाला, ''मी माझी मालमत्ता, कार आणि सर्व वस्तू विकल्या, कारण मला पुन्हा नवीन सुरुवात करायची होती.'' -
डेव्हन कॉनवे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यास सज्ज झाला आहे. अलीकडे, तो खेळपट्टीवर कचरा टाकून फलंदाजीचा सराव करताना दिसला होता.

Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS