-
ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) एकूण ५ गोल, हंगेरीविरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन गोल झळकावले होते. जर्मनीविरुद्ध १ गोल मारला. तर फ्रान्सविरोधात २ गोल झळकावले. (Indian express File Photo)
-
पॅट्रिक चिक (चेक रिपब्लिक) एकूण ३ गोल, स्कॉटलँडविरुद्ध पॅट्रिक चिकने दोन गोल झळकावले होते. क्रोएशियाविरुध्द एक गोल मारला होता. तर इंग्लंडविरुद्ध गोल करण्यात अपयश आलं. (Twitter/Euro 2020)
-
इमिल फोर्सबर्ग (स्वीडन) एकूण ३ गोल, स्लोवाकियाविरोधात इमिलने एक गोल मारला होता. या गोलमुळे स्वीडनने स्लोवाकियावर १-० ने विजय मिळवला होता. स्पेनविरुद्ध गोल करण्यात त्याला अपयश आलं. मात्र पोलंड विरोधात त्याने दोन गोल झळकावले. (Photo-Reuters)
-
रोमेलू लुकाकू, (बेल्जियम) एकूण ३ गोल, लुकाकूने रशियाविरोधात दोन गोल झळकावले. त्यानंतर फिनलँडविरुद्धच्या सामन्यात त्याने एक गोल झळकावला. (Twitter/Euro 2020)
-
जिओर्जिनो विझनाल्डम (नेदरलँड) एकूण ३ गोल, विझनाल्डमने युक्रेनविरोधात १ गोल झळकावला. नॉर्थ मसेडोनिया संघाविरोधात विझनाल्डमने दोन गोल झळकावले. (Photo-Reuters)
-
रॉबर्ट लेवानदॉस्की (पोलंड) एकूण ३ गोल, स्पेन विरोधात रॉबर्टने एक गोल झळकावला. त्यानंतर स्वीडन विरुद्धच्या सामन्यात २ गोल मारत संघाला विजय मिळवून दिला. (Photo-Reuters)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली