भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने २००८च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि भारतासाठी जेतेपद जिंकले. २०१०साली विराट कोहलीने पहिला एकदिवसीय सामना खेळला, त्यानंतर २०१०मध्ये टी-२० मध्ये पदार्पण केले. २०११मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराट कोहलीला १२वीनंतरचे शिक्षण घेता आले नाही. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने १२वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणाऱ्या रोहित शर्मानेही बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. रोहित हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नावावर पाच आयपीएल विजेतेपदे आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवननेही बारावीच्या पुढे अभ्यास न करता खेळाला प्राधान्य दिले. २०१० साली शिखर धवनला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. वनडेनंतर शिखर धवनने २०१ २०१३साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. -
सचिन तेंडुलकरने वयाच्या १६व्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत: ला वाहून घेतले. त्यामुळे मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरला फक्त १२वी पर्यंतच शिक्षण घेता आले. क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात एक वेगळेच स्थान मिळवले आहे. सचिन हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याने १०० आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग