महिला क्रिकेटपटू मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत २२ वर्षांचा दीर्घ प्रवास पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारी ती माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर दुसरी क्रिकेटपटू बनली आहे. राजस्थानात जन्मलेल्या मितालीने भारतीय महिला क्रिकेटला नवीन उंचीवर नेले आहे. तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय करिअरची २२ वर्षे पूर्ण केली आहेत. मितालीने २६ जून १९९९ रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सचिननची क्रिकेट कारकीर्द २२ वर्ष ९१ दिवसांची होती. जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने १८ डिसेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १८ मार्च २०१२ रोजी तिने पाकिस्तानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यात सचिनने ४८ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली. ३८ वर्षीय मितालीने तिच्या कारकीर्दीत ११ कसोटी, २१४ एकदिवसीय आणि ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने कसोटीत एक शतक आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने ६६९ धावा केल्या आहेत. तिने एकदिवसीय सामन्यात ७ शतके आणि ५५ अर्धशतकांसह ७०९८ धावा आणि टी-२० क्रिकेटमध्ये १७ अर्धशतकांसह एकूण २३६४ धावा केल्या आहेत. -
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ६ हजार धावा पूर्ण करणारी मिताली पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तिच्यापाठोपाठ माजी इंग्लिश महिला क्रिकेटपटू चार्लोट एडवर्ड्सचे नाव आहे. तिच्या खात्यात ५९९२ धावा आहेत.

Raghuram Rajan: ‘आत्ताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…