टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीपटू बजरंग पुनियाकडून पदकाची अपेक्षा आहे. तो ६५ किलो वजनी गटात भाग घेणार आहेत. गेल्या दोन वर्षांत तो देशातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक आहे. नीरज चोप्रा यावर्षी अॅथलेटिक्समधील भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याची अपेक्षा आहे. स्टार भालाफेकपटू असलेल्या चोप्राने २०१८मध्ये आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत पण ऑलिम्पिकमध्ये तो प्रथमच मैदानात उतरणार आहेत. तो गेल्या वर्षी जानेवारीत टोकियोसाठी पात्र ठरला होता. -
सहा वेळा विश्वविजेती मेरी कोम ही भारताची अनुभवी बॉक्सिंगपटू पदकाच्या शोधात असेल. मेरी ५१ किलो वजनी गटात भाग घेईल. २०१२च्या ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला बॉक्सिंगपटू आहे. कांस्यपदकाचे सुवर्णपदकात रुपांतर करण्यासाठी मेरी प्रयत्नशील असेल.
२०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू ही एकमेव भारतीय शटलर आहे, जी यावर्षी महिला एकेरी गटात भाग घेणार आहे. अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून पराभूत झाल्यानंतर सिंधुचे सुवर्ण हुकले होते. पण यंदा तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये यंदा १९ वर्षीय भारतीय खेळाडूकडून पदकाची अपेक्षा आहे. जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर असलेला नेमबाज सौरभ तिवारी पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि मिश्रित १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भाग घेणार आहे. २०१८मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सौरभ सर्वात युवा खेळाडू ठरला होता.

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या