-
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे प्रेम सर्वांनाच माहिती आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंकडे एकापेक्षा एक अलिशान गाड्या आहे. विशेष म्हणजे कर्णधारपदी असलेल्या खेळाडूंकडे तर लग्झरी गाड्यांचे कलेक्शन पाहायला मिळते.
-
भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. मात्र ते अनेकदा त्याच्या BMW 5-Series या गाडीतून फिरताना दिसतात.
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे BMW i8, BW X6M, BMW M5, BMW M3 या गाड्या आहेत. त्यासोबतच त्याच्याकडे बीएमडब्ल्यूच्या अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. विशेष म्हणजे सचिनकडे Ferrari 360 Modena आणि Mercedes-Benz C63 AMG या देखील गाड्या आहेत.
-
कपिल देव यांच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत. पण त्यांच्या कार कलेक्शनमध्ये Porsche Panamera या अलिशान गाडीचाही समावेश आहे.
-
भारतीय संघाचे स्टायलिश माजी कर्णधार म्हणून मोहम्मद अजहरुद्दीन यांना ओळखले जाते. मोहम्मद अजहरुद्दीन यांच्याकडे BMW 5-Series, Audi Q7, Honda CR-V आणि BMW 640i यासारख्या गाड्या आहे.
-
सौरव गांगुलीकडे फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंज सीएलके, होंडा सिटी आणि मर्सिडीज बेंज सी क्लास यासारख्या गाड्या आहेत.
-
राहुल द्रविड़कडे ऑडी Q5,बीएमडब्लू 5 सीरीज आणि ह्यूंडैची टक्सन कार आहे.
-
विरेंद्र सेहवागने काही सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. सेहवागकडे आलिशान बेंटले कॉन्टिनेंटल आणि बीएमडब्ल्यू 7 सीरीज कार आहे.
-
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्याकडे अलिशान गाड्या आहेत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये फोर्ड की एंडेवर आणि मर्सिडीज बेंज ई क्लास या गाडीचा समावेश आहे. ते अनेकदा याच गाडीतून बाहेर ये-जा करताना दिसतात.
-
भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला बाईक्सचा प्रचंड शौक आहे. मात्र त्यासोबतच त्याच्याकडे लग्झरी कारचे कलेक्शनही आहे. धोनीकडे हमर, लँड रोवर फ्रीलँडर 2, ऑडी Q7,पजेरो, टोयोटा कोरोला यासारख्या गाड्यांचा समावेश आहे.
-
विराट कोहलीकडे ऑडी R8 ही गाडी आहे. त्यासोबतच त्याच्याकडे ऑडी कंपनीची A6 स्पोर्ट्स सलून ही देखील गाडी आहे. कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा फॉर्च्यूनरचाही समावेश आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत