-
नुकतीचं टोक्यो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा पार पडली यामध्ये अनेक देशाच्या खेळाडूंनी आपलं वर्चस्व सिध्द केले. अनेक देशांच्या खेळाडूंनी सुवर्ण पदकाची कमाई करत देशाचं नाव उंचावलं. मात्र यामधील एक खेळाडू चांगलीच चर्चेत आहे.
-
ऑलिम्पिकमध्ये या महिला खेळाडूने तीन सुवर्ण पदकं जिंकली आहेत. या महिला खेळाडूने तीच्या यशाचं गुपित सांगितलं असून हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
-
ही महिला खेळाडू कोण आहे आणि तीने अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या ज्यामुळे क्रीडा विश्वात चर्चा सुरु आहे, हे आपण जाणून घेऊया.
-
ही महिला खेळाडू रशियाची एला शिशकिना आहे. एलाने टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी झाली होती.
-
एला शिशकिना पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेत असते. तीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देखील चांगली कामगिरी केली.
-
यापूर्वी तीने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक आणि २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकली होती.
-
एला रशियन न्यूज आउटलेट स्पोर्ट्स एक्सप्रेसशी तिच्या मैदानावरील कामगिरीबद्दल बोलली आहे.
-
एला म्हणाली, "वैज्ञानिक समुदायाचा असा विश्वास आहे की, जर तुम्हाला तुमच्या खेळात कमी वेळात पूर्ण ताकदीने कामगिरी करायची असेल तर सेक्स या बाबतीत फायदेशील असतो."
-
एला शिशकिना जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. एला शिशकिना कबूल केले की सेक्स हा व्यायामासारखा आहे, ज्यामुळे मैदानावर तिची सर्वोत्तम कामगिरी दिसून येते.
-
एला पुढे म्हणाली की "जर खेळात लांबचा प्रवास करायचा असेल आणि मैदानावरील कामगिरी चढ -उतारांनी भरलेली असेल तर मी कदाचित सेक्सला प्राधान्य देणार नाही".
-
"मला असे वाटते की याबाबत प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या शरीरानुसार निर्णय घ्यावा."
-
तसेच डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरचं योग्य तो निर्णय घ्यावा, असेही एलाने सांगितले.
-
एला शिशकिना सातत्याने चांगल्या कामगिरीसाठी सेक्सला प्राधान्य देते.
-
याबाबत एलाने तिचे डॉक्टर डेनिसशी चर्चा केल्याचे सांगितले. तसेच मला विज्ञान, संशोधन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावर विश्वास असल्याचे एला सांगते.
-
एला तिने सांगितलेल्या यशाच्या गुपितामुळे चांगली चर्चेत आली आहे.
-
मॉस्कोमध्ये जन्मलेल्या एलाने यापूर्वी देखील क्रीडा, लिंग आणि फिटनेसबद्दल आपले मत शेअर केले आहे. (All Photo : Alla shishkina Instagram)

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पहिल्यांदाच EVMची फेरमतमोजणी; तीन वर्षांनंतर फिरला निवडणुकीचा निकाल