-
तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भयानक परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ समोर येत आहेत.
-
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता स्थापन केल्यानंतर त्या देशातील अनेक नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचे चित्र दिसत आहे.
-
तालिबानने संपूर्ण व्यवस्थेवर वर्चस्व मिळवल्याने सध्या अफगाणिस्तान देश कठीण काळातून जात आहे.
-
आम्हाला संकटात मरण्यासाठी सोडले जाऊ नये, असे आवाहन अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खानने यापूर्वी नेत्यांना केले होते.
-
राशिदचे संपूर्ण कुटुंब अफगाणिस्तानात अडकले आहे. तर दुसरीकडे तो सध्या इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ लीगमध्ये खेळत आहे.
-
पण या काळात त्याला आपल्या देशाची म्हणजे अफगाणिस्तानची काळजी वाटत आहे.
-
‘द हंड्रेड’ लीगमधील एका सामन्यादरम्यान राशिदने अफगाणिस्तानला पाठिंबा दर्शवला.
-
ट्रेंड रॉकेट्सकडून खेळणाऱ्या राशिदचे देशप्रेम एका कृतीतून सर्वांसमोर आले.
-
लीगच्या एलिमिनेटर सामन्यात साउदर्न ब्रेवविरुद्ध राशिद जेव्हा मैदानात उतरला, तेव्हा त्याचा चेहरा पाहून सर्वांनी त्यांना सलाम ठोकण्यास सुरुवात केली.
-
‘द हंड्रेड’ लीगमधील महत्त्वाच्या सामन्यात राशिदने आपल्या चेहऱ्यावर अफगाणिस्तानचा झेंडा रंगवला होता. यानंतर त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
-
मात्र दुसरीकडे या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे तो अपयशी ठरला.
-
त्याच्या संघाला या सामन्यात ७ गड्यांनी पराभूत व्हावे लागले. आता त्याच्यासाठी ही लीग संपुष्टात आली आहे.
-
त्यामुळे राशिद खान आता त्याच्या घरी परततो की इंग्लंडमध्ये काही दिवसांच्या मुक्कामानंतर आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी यूएईला रवाना होतो, हे पाहावे लागेल.
-
त्याची आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने राशिद दुसऱ्या टप्प्यात खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
-
आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून रंगणार आहे.

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त