शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग असतो. कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी शिक्षण हे फार गरजेचे असते. -
मात्र काही असे क्षेत्र आहेत, ज्यात अनेकांनी त्यांच्या कर्तृत्वाने ते क्षेत्र गाजवले आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या चौकार आणि षटकार ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंच्या शिक्षणाबद्दल नेहमीच चर्चा होते.
-
भारतीय क्रिकेट संघातील कोणते क्रिकेटपटू किती सुशिक्षित आहेत? याची फार कमी लोकांना माहिती आहे.
-
अनिल कुंबळे – भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी मॅकनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.
-
सचिन तेंडुलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही फक्त १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले.
-
रोहित शर्मा – आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
-
विराट कोहली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
-
महेंद्रसिंह धोनी – कॅप्टन कूल अशी ओळख असणारा खेळाडू महेंद्रसिंह सिंह धोनी हा पदवीधर आहे. त्याने बी. कॉम केले आहे.
-
शिखर धवन- टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने १२ वीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
-
युवराज सिंग – टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंग याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

“तू करमणुकीचा धंदा करून पोट भर, पण…”, अथर्व सुदामेच्या रीलवर ब्राह्मण महासंघाचा संताप; व्हिडीओ डिलीट करत सुदामे म्हणाला…”