-
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन याने पत्नी आयेशासोबत घटस्फोट घेतला आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील नात्यात दुरावा आला होता.
-
नऊ वर्षांच्या संसारानंतर शिखर धवन आणि आयेशा यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
-
शिखर धवनच्या चाहत्यांना या घटस्फोटामुळे आश्चर्य वाटत आहे.
-
शिखर धवनची लव्हस्टोरीही एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे.
-
शिखर आणि आयेशा यांची ओळख फेसबुक द्वारे झाली होती.
-
भारताचा स्टार ऑफस्पिनर हरभजन सिंगने शिखर आणि आयेशाची भेट घडवून दिली.
-
शिखरने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
दोघांमधील गाठीभेटी वाढल्या आणि ते एकमेकांना डेट करू लागले.
-
शिखर धवन आणि आयेशा या दोघांच्या वयामध्ये जवळपास १० वर्षांचं अंतर आहे.
-
ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवनने आयेशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं.
-
या दोघांच्या लग्नावेळी आयेशा ३७ वर्षांची होती. तर, शिखर २७ वर्षांचा होता.
-
आयेशाचं हे दुसरं लग्न होतं.
-
आयेशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.
-
शिखर आणि आयेशा यांना एक सात वर्षाचा मुलगा असून त्याचं नाव जोरावर आहे.
-
२०१४ मध्ये जोरावरचा जन्म झाला.
-
मेलबर्नमध्ये राहणारी आयेशा मुखर्जी लग्नाच्या नऊ वर्षांनी शिखर धवनपासून विभक्त होत आहे.
-
शिखर धवनने घटस्फोटावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
-
यापूर्वी दोघांनी इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केलं होते.
-
इतकंच नाही तर आयेशाने शिखर सोबतचे एकत्र फोटो देखील डिलीट केले होते.
-
यानंतर दोघांमध्ये अंतर आल्याची चर्चा सुरु झाली होती.
-
दरम्यान दोघांनी घटस्फोट घेतल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिखर धवन, आयेशा / इन्स्टाग्राम)

रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश