-
वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरीच जणू. याच मैदानावर एक इतिहास घडला. भारत न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात संपूर्ण भारतीय संघाला न्यूझीलंडच्या एकाच गोलंदाजानं चितपट केलं, तो म्हणजे एजाज पटेल.
-
याआधी कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम इंग्लंडचे जिम लेकर आणि भारताचे अनिल कुंबळे यांच्या नावावर होता. आता त्यात एजाजचं नावही समाविष्ट झालं आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया एजाजबद्दलच्या काही गोष्टी…
-
९ कसोटी, ७ ट्वेन्टी-20 सामन्यात ३३ वर्षीय एजाजने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. एजाजचा जन्म मुंबईचा पण आठव्या वर्षी आईवडिलांसह तो न्यूझीलंडला रवाना झाला.
-
त्याच्या वडिलांनी तिथे गॅरेज उभारलं. त्याची आई मुंबईत असताना शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती.
-
वेगवान गोलंदाज म्हणून एजाजनं खेळायला सुरुवात केली. प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार एजाज फिरकी गोलंदाज झाला. ६८ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये त्याने २५१ विकेट्स घेतल्या.
-
न्यूझीलंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर एजाजला तीन वर्षांपूर्वी पदार्पणाची संधी मिळाली.
-
पदार्पणाच्या कसोटीतच ७ विकेट्स घेत एजाजने ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला होता.
-
एजाजचा न्यूझीलंड संघातील सहकारी मिचेल मक्लेघान आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी खेळायचा. मिचेलच्या निमित्ताने एजाजला मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये नेट बॉलर म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती.
-
मिचेल मुंबई इंडियन्स संघाचा भाग असताना एजाज वानखेडे स्टेडियमवर काही सामने पाहायला आला होता. कौटुंबिक सोहळ्यांसाठीही एजाज मुंबईत नियमितपणे येत असतो.
-
आयसीसीने ‘नाव लक्षात ठेवा’ म्हणून एजाजचं कौतुक करत ट्वीट केलं आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही एजाजवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“शासन भिकारी आहे”, कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद? फडणवीस नाराजी व्यक्त करत म्हणाले…