-
भारतीय संघाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा आज ६३ वा वाढदिवस.
-
कपिल देव यांचा जन्म ६ जनवरी १९५९ मध्ये चंडीगढ येथे झाला होता.
-
कपिल देव यांनी आपल्या १६ वर्षांच्या करिअरमध्ये १३४ कसोटी सामन्यांत ४३४ विकेट घेतल्या आहेत.
-
याशिवाय त्यांनी ८ शतके देखील ठोकली आहेत.
-
कपिल देव भारतीय संघाचे सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात.
-
कपिल यांनी २२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २३.७९ सरासरीने ३७८३ धावा केल्या आहेत.
-
तर २५३ विकेट्स देखील पटकावल्या आहेत.
-
प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज कपिल देव यांच्या गोलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजीची दखल घेऊ लागले होते.
-
भारतीय वेगवान गोलंदाजीचा एक वेगळा पायंडा कपिल देव यांनी घालून दिला.
-
भारताच्या इतिहासामध्ये २५ जून १९८३ ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली आहे.
-
लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
-
कपिल देव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… (सर्व फोटो सौजन्य : कपिल देव / इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल