-
शिकण्यासाठी किंवा करिअर करण्यासाठी वय नसते. अमेरिकेतील नेवाडा येथे राहणाऱ्या ४२ वर्षीय वेंडी लेवराने ते सिद्ध केले आहे. वेंडी एक प्रोफेशनल बॉडीबिल्डर आणि पर्सनल ट्रेनर आहे.
-
वेंडीने खुलासा केला, की जेव्हा ती ३५ वर्षांची होती, तेव्हा कोणीतरी तिला बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. यानंतर तिने सराव सुरू केला. तिचे प्रयत्न पाहून पतीने तिच्या शरीराची चेष्टा केली.
-
यानंतर वेंडीने प्रोफेशनल बॉडीबिल्डर बनण्याचा निर्णय घेतला. तिने इन्शुरन्सची नोकरी सोडली आणि बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर घडवायला सुरुवात केली.
-
वेंडीने पतीलाही घटस्फोट दिला आहे. ती गेल्या ३ वर्षांपासून आपल्यापेक्षा १५ वर्षांनी लहान म्हणजेच २७ वर्षांच्या शॉन ओफ्लॅटरीला डेट करत आहे. वेंडी ही दोन मुलांची आजी देखील आहे. तिने स्वत:ला ‘पुमा’ असे नाव दिले आहे.
-
शॉन ओफ्लॅटरीला डेट करण्याबाबत वेंडी म्हणाली, “आमच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. नंतर मला जाणवले, की आपल्यात मैत्रीपेक्षाही काहीतरी जास्त आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या घराचे भाडे भरण्यात मला आर्थिक अडचणी येत होत्या. शॉन आम्ही एकत्र आलो आणि एकत्र राहू लागलो.”
-
वेंडी म्हणाली, ”आम्हा दोघांना बाहेर जाणे आणि प्रवास करणे सारख्याच गोष्टी आवडतात. आम्हाला पॅडलबोर्डिंग आणि शॉपिंग आवडते. आम्ही विचित्र गोष्टींवर खूप पैसे खर्च करतो आणि आम्हाला संगीतातही तीच चव आहे.”
-
वेंडी म्हणाली, ‘मला स्वतःला पुमा म्हणायला आवडते. मी तशी म्हातारी नाही. शॉन माझ्या मुलांशीही चांगला वागतो.” वयाच्या १७ व्या वर्षी वेंडी पहिल्यांदा आई झाली. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. आई होण्यासाठी तिला तिचे हायस्कूल सोडावे लागले. वेंडीचा धाकटा मुलगा आता १६ वर्षांचा आहे. तो त्याच्या आईसोबत वेंडीच्या स्पर्धांमध्ये जातो.
-
वेंडी म्हणते, ‘माझी सर्वात मोठा मुलगा आता २५ वर्षांचा आहे. त्याचे आणि शॉनचे खूप छान जमते माझा मुलगा शॉनला पहिल्यांदा भेटला तेव्हा फार आनंदी झाला नाही. आमच्यासाठी वयाची समस्या कधीच नव्हती. माझा मोठा मुलगा आयडाहो येथे राहतो. त्याचे स्वतःचे एक कुटुंब आहे. त्याला दोन मुले आहेत.” (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून साभार)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक