-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई संघ खास कामगिरी करु शकलेला नाहीये.
-
मात्र या संघातील ऋतुराज गायकवाड चांगला फॉर्ममध्ये आहे.
-
त्याने एक अनोखी कामगिरी केली असून क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरलादेखील मागे टाकलं आहे.
-
त्याने १ मे रोजी हैदरबादविरोधातील सामन्यामध्ये ९९ धावा करत धमाकेदार फलंदाजी केली.
-
त्याने या सामन्यामध्ये आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या.
-
तो भारतीय खेळाडूंमध्ये सर्वात कमी डावांत म्हणजेच ३१ डावांमध्ये एक हजार धावांचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरला आहे.
-
सचिन तेंडुलकरनेही ३१ डावांमध्ये एक हजार धावा केलेल्या आहेत. ३१ डावांमध्ये सचिनने १०६४ केलेल्या आहेत.
-
तर ऋतुराजने ३१ डावांत १०७६ धावा केल्या. म्हणजेच ३१ डावांत एक हजार धावा करताना ऋतुराजने सचिनपेक्षा १२ धावा जास्त केल्या.
-
एक हजार धावांचा टप्पा गाठताना ऋतुराजने सचिनला अशा प्रकारे मागे टाकले.

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…