-
आयपीएलच्या १५ व्या पर्वाचे जेतेपद गजरात टायटन्सने पटकावले. हा हंगाम अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला.
-
या हंगामात जोस बटलरने सर्वाधिक ८६३ धावा केल्या. या धावसंख्येसह त्याने ऑरेंज कॅप पटकावली.
-
सर्वाधिक धावसंख्येमुळे त्याला ऑरेंज कॅप मिळाली. याच कामगिरीमुळे त्याला दहा लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
-
राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने पर्पल कॅप पटकावली. त्याने १७ सामन्यांत एकूण २७ विकेट्स घेत हा बहुमान मिळवला.
-
या कामगिरीमुळे त्याला पर्पल कॅपसह दहा लाख रुपयांचा चेक देण्यात आला.
-
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या उमरान मलिक या वेगवान गोलंदाजाने इमर्जिंग प्लेअर होण्याचा मान पटकावला. त्यालादेखील १० लाख रुपयांचा चेक बक्षीस म्हणून देण्यात आला.
-
बंगळुरु संघाकडून खेळणारा फलंदाज दिनेश कार्तिक या पर्वातील सुपर स्ट्राईकर ठरला. त्याने संघाला अनेकवेळा एकहाती विजय मिळवून दिला. याच कारणामुळे सुपर स्ट्राईकर ऑफ द सिझनचा बहुमान मिळवत त्याने १० लाख रुपयांचे बक्षीस पटकावले.
-
लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या एविन लुईसने टिपलेला झेल या हंगामातील सर्वोत्तम झेल ठरला. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत खेळताना रिंकू सिंहचा हा झेल टिपला होता. याच सर्वोत्तम झेलमुळे त्याला १० लाख रुपयांचा चेक देण्यात आला.
-
लॉकी फर्ग्यूसनने या पर्वातील सर्वात वेगवान चेंडू फेकला. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने १५७.३ किमी प्रति तास या वेगाने चेंडू पेकला होता. त्यामुळे फास्टेस्ट डिलिव्हरी ऑफ दी सिझन टाकल्यामुळे त्याला दहा लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. (फोटो क्रेडिट- इंडियन एक्स्प्रेस)

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा