-
मंगळवारी (१२ जुलै) केनिंग्टन ओव्हल येथे झालेला एकदिवसीय सामना भारताने जिंकला.
-
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारताने प्रथमच इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला.
-
जसप्रीत बुमराहने ‘फाइव्ह विकेट हॉल’ मिळवत एकूण सहा बळी घेतले.
-
तीन बळी घेऊन मोहम्मद शमीने त्याला खंबीर साथ दिली.
-
इंग्लंडने भारताला विजयासाठी १११ धावांचे लक्ष्य दिले होते.
-
रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी नाबाद शतकी सलामी दिली.
-
कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावांची खेळी करून त्याने २५० षटकारांचा टप्पा पार केला.
-
आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५०वा सामना खेळणाऱ्या शिखरने नाबाद ३१ धावा केल्या.
-
सामना जिंकल्यानंतर शिखर धवनने विराट कोहलीसोबत फोटो काढून आनंद साजरा केला. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर/इन्स्टाग्राम)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम