-
भारताचा महान फुटबॉलपटू आणि कर्णधार सुनील छेत्रीला फिफाकडून मोठा सन्मान मिळाला आहे.
-
भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्या शानदार कारकिर्दीबद्दल फिफाने एक विशेष मालिका तयार केली आहे.
-
‘कॅप्टन फॅन्टास्टिक’ नावाची मालिका FIFA+ वर उपलब्ध आहे आणि त्यात तीन भाग आहेत.
-
फिफा विश्वचषकाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर माहितीपटाची माहिती देण्यात आली आहे.
-
आंतरराष्ट्रीय फुटबॉल नियामक मंडळाच्या मालिकेत छेत्रीचा सहभाग प्रमुख आहे, कारण तो फिफा विश्वचषक स्पर्धेत अद्याप सहभागी न झालेल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतो.
-
सुनील छेत्रीच्या या कामगिरीबद्दल त्याचा मित्र भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहलीने त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.
-
सुनील छेत्रीच्या ८४ गोल करण्याच्या पराक्रमामुळे त्याला फुटबॉलमधील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यासोबत उभे राहण्याचा मान मिळाला आहे.
-
FIFA+ हा जागतिक संस्थेचा एक प्रकल्प आहे आणि ही मालिका त्या प्रकल्पाचा एक भाग आहे.
-
छेत्री सध्या राहत असलेल्या बंगळुरूमध्ये काही सीन शूट करण्यात आले आहेत. याशिवाय या मालिकेचे शूटिंग दिल्लीतही झाले आहे, जिथे त्याचे आई-वडील राहतात आणि छेत्रीचे बालपणही गेले आहे.(all photos: indian express)

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला