-
फिफा फायनलमध्ये ३५ वर्षीय लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव केला. सामना संपल्यावर ३-३ अशी बरोबरी राहिली, त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. येथे अर्जेंटिनाने ४-३ असा विजय मिळवून इतिहास रचला. (AP Photo/Manu Fernandez)
-
लिओनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले आणि ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला. लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक होता, त्यामुळे त्याच्यासाठी तो केकवर आयसिंग करण्यासारखा होता. या ऐतिहासिक विजयानंतर लिओनेल मेस्सीनेही जल्लोष साजरा केला आणि आनंदाने उड्या मारल्या. (AP Photo/Francisco Seco)
-
कर्णधार असल्याने, लिओनेल मेस्सीला ट्रॉफी देण्यात आली आणि तो मंचावरच आनंदाने नाचला, उड्या मारल्या आणि डान्स देखील केला. लिओनेल मेस्सीने प्रथम ट्रॉफीचे चुंबन घेतले आणि त्याकडे उत्साहाने पाहिले. गेल्या जवळपास २ दशकांपासून मेस्सी हे स्वप्न घेऊन जगत होता आणि आता त्याने ते पूर्ण केले आहे.(AP Photo/Francisco Seco)
-
लिओनेल मेस्सी जेव्हा ट्रॉफी घेऊन त्याच्या टीमला स्टेजवर पोहोचला तेव्हा संपूर्ण टीम त्याच्यासोबत नाचू लागली. लिओनेल मेस्सी ट्रॉफी हातात घेऊन उड्या मारत होता आणि उत्सवात पूर्णपणे मग्न झाला होता. सेलिब्रेशन आटोपल्यानंतर लिओनेल मेस्सी त्याच्या कुटुंबाला पोहोचला. (AP Photo/Christophe Ena)
-
अर्जेंटिना अखेर विश्वविजेता ठरला. तब्बल ३६ वर्षांनंतर या संघाला फिफा विश्वचषक ट्रॉफी मिळाली. एवढ्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर विश्वविजेता बनण्याचा सेलिब्रेशन अप्रतिम होता. यादरम्यान दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पण शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला. इथे लिओनेल मेस्सीच्या संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा ४-२ असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.(AP Photo/Manu Fernandez)
-
जेव्हा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे फिफा विश्वचषक ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली तेव्हा तो अतिशय अनोख्या पद्धतीने ही ट्रॉफी घेऊन सहकारी खेळाडूंकडे आला होता. खेळाडूंची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी होती. तो त्याच्या सहकाऱ्यांमध्ये पोहोचला आणि ट्रॉफी उचलताच, सर्वांनी जल्लोष केला. (AP Photo/Francisco Seco)
-
लिओनेल मेस्सीच्या संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा ४-२ असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. त्यानंतर लिओनेल मेस्सी आणि त्याच्या टीमच्या इतर सर्व खेळाडूंनी अगोदर मैदानावर जल्लौष केला. त्याने ट्रॉफीचे चुंबन घेऊन तिला न्याहळतानाचे दृश्य अतिशय भावूक करणारे होते. (AP Photo/Manu Fernandez)
-
२०व्या मिनिटाला फ्रान्सच्या बचावपटूने केलेल्या धसमुसळ्या खेळाचा फायदा उठवत मेस्सीने मिळालेली पेनल्टी सत्कारणी लावत संघाला आघाडीवर नेले. पहिल्या गोलचा जल्लोष चाहते करत असतानाच मेसीने आणखी एक आक्रमण रचले. डाव्या बगलेतून त्याने रचलेल्या आक्रमणाला ऍंजेल डी मारिया याने गोलच्या स्वरूपात बदलले. ३६व्या मिनिटाला झालेल्या या गोलमुळे अर्जेंटिना संघ सामन्यात पुढे गेला. (AP Photo/Natacha Pisarenko)
-
सामना एक वेळ अर्जेंटिनाच्या बाजूने गेला आहे असे वाटत असताना स्पर्धेत पाच गोलल झळकावलेला किलियन एमबाप्पे फ्रान्सच्या मदतीला धावला. ८०व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी त्यांनी गोलमध्ये ढकलत पिछाडी भरून काढली. पुढच्याच मिनिटाला त्याने आणखी एक सुरेख गोल करत फ्रान्सला सामन्यात बरोबरी करून दिली. त्याने कालच्या सामन्यात एकूण ४ गोल केले. (AP Photo/Thanassis Stavrakis)
-
फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेला गोल्डन बूट हा पुरस्कार मिळाला… हा पुरस्कार सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. ज्यामध्ये सोन्याने बनवलेला एक जोडा असतो आणि त्याद्वारे खेळाडूला सन्मानित केले जाते. हा पुरस्कार १९८२ पासून सुरू करण्यात आला. उपविजेता ठरलेला फ्रेंच स्टार खेळाडू एमबाप्पेने संपूर्ण स्पर्धेत एकूण ९ गोल नोंदवले / त्यात अंतिम सामन्यातील तीन गोलचा समावेश आहे. लिओनेल मेस्सी या शर्यतीत ७ गोलसह दुसऱ्या स्थानावर राहिला. (AP Photo/Natacha Pisarenko)
-
किलियन एमबाप्पेच्या दोन गोलने फ्रान्सच्या पाठीराख्यांमध्ये प्राण फुंकले. ८ मिनिटांच्या भरपाई वेळेत दोन्ही संघांच्या गोलरक्षकाने एकेक गोल रोखला अन् सामना अतिरिक्त ३० मिनिटांत गेला. पहिली १५ मिनिटे तोडीसतोड खेळ झाल्यानंतर लिओनेल मेस्सीची जादू पुन्हा चालली अन् त्याने १०८व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून दिला असे वाटत असताना एमबाप्पेने पुन्हा सामना फिरवला. (AP Photo/Manu Fernandez)
-
कतार येथे रविवारी, १८ डिसेंबर २०२२ रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील विश्वचषक अंतिम फुटबॉल सामन्यादरम्यान अर्जेंटिनाचे चाहते बार्सिलोना, स्पेनमधील बारमध्ये आनंद साजरा करत आहेत. (AP Photo/Emilio Morenatti)
-
अर्जेंटिनाचा रॉड्रिगो डी पॉल, रविवार, १८ डिसेंबर, २०२२ रोजी लुसेल, कतार येथील लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील विश्वचषक अंतिम सॉकर सामन्यानंतर आनंद साजरा करताना. (AP Photo/Frank Augstein)
-
सामना जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी मैदानात डान्स केला. मेस्सी, डी मारिया, डिबेला, अग्युरोसह सर्व अर्जेंटिनाचे खेळाडू त्यांच्या चाहत्यांसमोर नाचत आणि गाणे म्हणत राहिले. यादरम्यान अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी संपूर्ण स्टेडियममध्ये आपल्या खेळाडूंना पाठिंबा दिला. (AP Photo/Francisco Seco)
-
रविवारी अर्जेंटिना जिंकल्यानंतर संपूर्ण अर्जेंटिनामध्ये रस्यांवर उतरून जल्लोष करताना फुटबॉल चाहते आनंद साजरा करत होते. कारण तब्बल १९८६ नंतर अर्जेंटिनाने विश्वचषकावर तिसऱ्यांदा नाव कोरले. त्यामुळे संपूर्ण रात्रभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. (AP Photo/Rodrigo Abd)
-
लाखो अर्जेंटाईन रडले, ओरडले आणि मिठी मारली जेव्हा अर्जेंटिनाने विश्वचषक जिंकला, त्यावेळी भावनांचा पूर ओसंडून वाहत होता. संपूर्ण सामन्यादरम्यान, ब्युनोस आयर्समधील सार्वजनिक चौकात पाहणाऱ्या अनेकांनी कर्णधार लिओनेल मेस्सीच्या नावाचा जयजयकार केला, ज्याला अनेकदा जगातील महान फुटबॉलपटू मानले जाते. मेस्सीने त्याच्यासोबत फुटबॉल चाहत्यांचे स्वप्न देखील साकार केले. (AP)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल