-
भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं स्वप्न अखेर साकार झालं आहे. दोन वर्ष मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये बसून असलेल्या अर्जुन तेंडुलकरला पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळालं आहे. (PC : Mumbai Indian/Twitter)
-
अर्जुन तेंडुलकरने आज (१६ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पदार्पण केलं आहे. अर्जुन तेंडुलकरला २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने २० लाख रुपये इतक्या बेस प्राईसवर खरेदी केलं होतं. त्यानंतर २०२३ मध्ये मुंबईने त्याला २५ लाख रुपये इतक्या किंमतीत पुन्हा खरेदी (रिटेन) केलं. (PC : Mumbai Indian/Twitter)
-
मुंबई विरुद्ध कोलकाता सामना सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अर्जुनला त्याची पदार्पणाची कॅप (मुंबई इंडियन्सची टोपी) दिली. ही कॅप घालताना अर्जुनचा आनंद गगनात मावत नव्हता. (PC : Mumbai Indian/Twitter)
-
मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मधळ्या फळीतला स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आज मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत आहे. (PC : Mumbai Indian/Twitter)
-
सूर्यकुमार यादवने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकात त्याने अर्जुनकडेच चेंडू सोपवला. पहिल्या षटकात गोलंदाजी करताना अर्जुनने केवळ चार धावा दिल्या. (PC : Mumbai Indian/Twitter)
-
गेल्या काही दिवसांपासून अर्जुन तेंडुलकर सातत्याने त्याचे वडील सचिन तेंडुलकरसोबत प्रशिक्षण घेत आहे. अखेरच त्याची मेहनत फळाला आली आहे. (PC : Indian Express)
-
अर्जुन हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो, तसेच तो खालच्या क्रमांकावर फलंदाजी देखील करतो. (PC : Indian Express)
-
अर्जुन प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये यापूर्वी खेळला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा अर्जुनचा पहिलाच सामना आहे. (PC : Arjun Tendulkar/Instagram)
-
अर्जुन याआधी फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए सामने खेळला आहे. आता त्याचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. (PC : Arjun Tendulkar/Instagram)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत”, भाजपाच्या मंत्र्याची मोठी प्रतिक्रिया