-
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सोमवारी रांचीत पार पडला. (फोटो : अधिकृत आयसीसी इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
रांचीमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामान्य बद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर नवीन विक्रम बनवणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले जात आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव करत मालिकेत ३-१ ने अजेय आघाडी घेतली आहे. (फोटो : अधिकृत आयसीसी इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
अश्विननेही या सामन्यामध्ये पाच विकेट घेत एक नवीन विक्रम रचला आहे. (फोटो : अधिकृत आयसीसी इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
बी. एस चंद्रशेखर अजूनही भारतातील सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्या पहिल्या पाच गोलंदाजांच्या यादीत येतात. 1964 ते 1979 या 13 वर्षांच्या शानदार कारकिर्दीत त्यांनी 16 वेळा पाच विकेट प्रती सामना असे विक्रम बनवले आहे. (फोटो : आयसीसी )
-
कपिल देव यांनी कसोटी कारकीर्दीत ४३४ बळी घेतले ज्यात २३ वेळ पाच बळी घेण्याचा विक्रम आहे, जो अजूनही कसोटीतील भारतीय वेगवान गोलंदाजाने केलेला सर्वाधिक आकडा आहे. (फोटो : अधिकृत कपिल देव इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
रविचंद्रन अश्विनने भारतासाठी ३५वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत, म्हणजे प्रति मॅच पाच विकेट. अश्विनने ९९ कसोटी सामने खेळले असून, त्याने ५०७ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. (फोटो: रॉयटर्स)




