-
क्रिकेट हा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध खेळ आहे. या खेळामधून क्रिकेटपटू केवळ जगभरात नाव आणि प्रसिद्धीच मिळवत नाहीत तर अफाट संपत्ती देखील कमावतात.
-
काही खेळाडू मोठ्या उंचीवर पोहोचतात तर काही असे आहेत जे काही सामने खेळल्यानंतर दिसेनासे होतात. (फोटो-संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)
-
त्यापैकीच एक म्हणजे श्रीलंकेचा माजी ऑफस्पिनर सूरज रणदीव.
-
उजव्या हाताचा ऑफस्पिनर सूरज रणदीवची श्रीलंकेत तरुण वयात यशस्वी कारकीर्द झाली. त्याने आपल्या देशाचे अंडर-15 आणि अंडर-19 स्तरावर प्रतिनिधित्व केले आणि 2003-04 अंडर-23 स्पर्धेत चार सामन्यांत 23 बळी घेतले.
-
सूरज रणदीवने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच वर्षी सुरजने वीरेंद्र सेहवागला डंबुला वनडेत शतक झळकावण्यापासून रोखले होते. वास्तविक 99 धावांवर खेळत असलेल्या वीरेंद्र सेहवागला सूरजने नो बॉल टाकून शतक झळकावण्यापासून रोखले होते.
-
या चेंडूवर सेहवागने षटकार मारला होता, पण तो नो बॉल असल्याने त्याचा षटकार मोजला गेला नाही आणि शतक झळकावण्यापासून तो एका धावेने हुकला. सूरजने जाणूनबुजून नो बॉल टाकला होता, ज्यासाठी त्याने नंतर माफी मागितली होती.
-
यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सूरज रणदीवला एका सामन्यासाठी निलंबित केले, तर कर्णधार तिलकरत्ने दिलशानला दंड ठोठावला. हा गोलंदाज 2011 च्या विश्वचषक फायनलमध्येही श्रीलंकेच्या संघासोबत होता त्याला हवे तितके यश मिळाले नाही.
-
सूरज श्रीलंकेसाठी 12 कसोटी सामने खेळला आहे. त्याच्या नावावर 43 विकेट आहेत. जर आपण एकदिवसीय फॉरमॅटमधील त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 31 सामने खेळले आणि 36 विकेट घेतल्या, तर 7 टी-20 सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या. सूरजने श्रीलंकेसाठी शेवटचा वनडे सामना २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
-
सूरजही आयपीएलचा भाग राहिला आहे. 2011 मध्ये, तो चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळला. त्या मोसमात त्याने 8 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या. या मोसमात CSK संघ चॅम्पियन ठरला. मात्र क्रिकेट सोडल्यानंतर सूरज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ऑस्ट्रेलियात बस ड्रायव्हर बनला आहे. तो मेलबर्नस्थित ट्रान्सडेव्ह कंपनीत बस चालक म्हणून काम करतो.
(फोटो स्त्रोत: ESPNcricinfo)

हिंजवडीतील आयटी कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद; ४०० फ्रेशर्स रस्त्यावर